Mumbai News : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी राज्यात सध्या जोरात सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर जागावाटपाचा पेच सोडवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सध्या जोरबैठका सुरु आहेत. राज्यातील अनेक जागांची लढत ही अत्यंत प्रतिष्ठेची झाली असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केले आहे. लोकसभेप्रमाणेच येत्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची कोंडी करणार असल्याचे सांगितले.
प्रसारमाध्यमाशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प, स्टे दिलेले स्पीड ब्रेकर घातलेले प्रकल्प आम्ही सुरु केले. विकासाचे प्रकल्प, कल्याणकारी योजना, लाडकी बहीण सारख्या अनेक योजना आम्ही आणल्या. विकास आणि योजना याची सांगड घालण्याचे काम आम्ही केले. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर उद्योग आले आहेत. जनता जनार्दन येणाऱ्या काळात आमच्या कामाची पोचपावती देईल, असे मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्ट केले.
ठाणे लोकसभा जिंकण्यासाठी त्यांना जंग जंग पछाडले. मात्र, त्यांची पळता भोई थोडी झाली. बाळासाहेबांचे विचार सोडले. त्यामुळे ठाकरेंची कोकणाने साथ सोडली. आता एकही आमदार कोकणात दिसणार नाही. कोकणात एकही खासदार आला नाही, आता एकही आमदार येऊ देणार नाही; सगळे किल्ले उद्ध्वस्थ झाले आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टीका केली.
लोकसभा निवडणुकीवेळी आमचा स्ट्राईक रेट 47 टक्के होता, त्यांचा 40 टक्के स्ट्राईक रेट होता. या पुढे बोलताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, महायुतीमध्ये कोणताही वाद नाही. चांगलं वातावरण आपण महाराष्ट्रात पाहातोय. सकारात्मकता आणि हॅप्पीनेस आपण महाराष्ट्रात पाहातोय. महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटेल. तुम्हाला सर्व आजच सांगणार नाही. काही बाबी त्यानंतर सांगण्यात येतील.
लोकसभा निवडणुकीत मशालीविरुद्ध धनुष्यबाण जिंकलेला आहे. लोकसभेत आम्ही 13 जागा समोरासमोर लढल्या. त्यातल्या आम्ही सात जागा जिंकल्या. आमचा 47 टक्के स्ट्राईक रेट होता, त्यांचा 40 टक्के स्ट्राईक रेट होता. त्यांच्यापेक्षा 2 लाख 60 मते आम्ही जास्त घेतली आहेत, असेही एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केले.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आमचा स्ट्राईक रेट उबाठापेक्षा चांगला होता. कामाच्या जोरावर महायुतीचा विधानसभेला स्ट्राईक रेट एकदम सगळ्यात भारी असणार आहे. महायुती सर्वांना चारीमुंड्या चित करेल. या निवडणुकीत आमचे लोक चौकार -षटकार मारतील, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
लाडकी बहीण योजनेच्या विरोधात काँग्रेसचा एक वडपल्लीवार न्यायालयात गेला आहे. लाडकी बहीण योजना महाविकास आघाडीच्या पाटात सलतीये. त्यांच्या डोळ्यात खुपत आहे. त्यांना आता जनता साथ देणार नाही. कोणीही माई का लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. त्याचे पैसे वाढत जातील. योजना बंद पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना लोक घरी बसवतील, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.