Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर दोन पक्षांची निर्मिती झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, असे दोन पक्ष आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं घड्याळ चिन्हं गोठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीय.
यावर निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाची भूमिका मांडली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे घड्याळ चिन्हं गोठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याचिका दाखल केली आहे. यावर निवडणूक काळात आयोगाची भूमिका काय असेल, यावर निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी स्पष्ट भूमिका मांडली.
राजीव कुमार म्हणाले, "निवडणूक आयोगाकडे सुरवातीला दाखल झालेल्या प्रकरणात राजकीय चिन्हांबाबत निर्णय दिलेला आहे. ज्या पक्षांचे दोन गट आहेत, त्यांना आम्ही त्यांच्या विनंतीनुसार इतर चिन्हं दिलेली आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) विषय न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे त्यांच्या चिन्हाबाबत आताच काही सांगू शकत नाही".
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार, यावर राजीव कुमार म्हणाले, "महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबरपर्यंत आहे. तेव्हा विधानसभा सदस्यांची मुदत संपणार आहे. नवीन विधानसभेसाठी निवडणूक घ्यावी लागेल. या निवडणुका विधानसभेच्या 26 नोव्हेंबरपूर्वीच पार पडतील".
राजीव कुमार यांनी महाराष्ट्रातील मतदारांची माहिती देताना, एकूण 9.59 कोटी मतदार असल्याचे सांगितले. पुरूष 4.59 कोटी, तर महिला मतदार 4.64 कोटी आहे. 18 ते 19 वयोगटातील प्रथम मतदार 19.48 लाख आहेत. यावेळी मतदानाचा टक्का वाढवण्याच्या दृष्टीने राज्यातील प्रशासनाला निर्देश दिल्याचे राजीव कुमार यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.