Congress Lok Sabha Candidate List : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने महाराष्ट्रातील उमेदवारांची चौथी यादी आज (बुधवारी) जाहीर केली. यामध्ये जालना आणि धुळे या मतदारसंघामधील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
काँग्रेसने जाहीर केलेल्या चौथ्या यादीत जालना मतदारसंघामधून डॉ. कल्याण काळे यांना, तर धुळे मतदारसंघामधून माजी मंत्री डॉ. शोभा दिनेश बच्छाव यांना उमेदवारी मिळाली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भाजपतर्फे सुभाष भामरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांना टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसच्यावतीने शोभा बच्छाव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या तीन निवडणुका नंतर पहिल्यांदाच जिल्हा बाहेरील उमेदवाराला उमेदवारी जाहीर झाली आहे.
धुळे लोकसभा मतदारसंघातील नाशिक जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघांमध्ये तगडा जनसंपर्क असल्यामुळे शोभा बच्छाव यांना काँग्रेस तर्फे उमेदवारी देण्यात आली असल्याचं सांगितलं जात आहे.
तर दुसरीकडे जालना लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपने विद्यामान खासदार रावसाहेब दानवे यांनाच उमेदवारी जाहीर केलेली आहे. त्यांचे तगडे आव्हान पेलण्यासाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसने डॉ. कल्याण काळे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.
राजकारणात वाढपी आपला असला तर ताटात जास्त वाढून घेता येते, असं नेहमीच म्हटलं जातं. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या बाबतीत हे तंतोतंत लागू होतं. विजयातील सातत्य, मतदारसंघाशी जोडली गेलेली नाळ, रस्त्यांचे जाळे, रेल्वे मार्गांचे दुहेरीकरण, विद्युतीकरण, देशातील महत्वाकांक्षी वंदे भारत ट्रेन, ड्राय पोर्टची उभारणी असं 'सब कुछ जालना' म्हणत रावसाहेब दानवे यांनी पक्षश्रेष्ठींना सलग सहाव्यांदा उमेदवारी देण्यास भाग पाडले आहे.आता त्यांच्या समोर निवडणडणुकीच्या रिंगणात काँग्रेसचे कल्याण काळे असणारआहेत.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.