Congrees Invite Thackeray-Pawar For Bharat Jodo Yatra News.
Congrees Invite Thackeray-Pawar For Bharat Jodo Yatra News. Sarkarnama
महाराष्ट्र

काॅंग्रेसचे निमंत्रण, पण ठाकरे-पवार भारत जोडो यात्रेत सहभागी होणार का ?

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : काॅंग्रेस नेते राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात दाखल होत आहे. केंद्रातील भाजप सरकारच्या विघातक राजकारणाच्या विरोधातील या यात्रेला दक्षिणेतील राज्यांमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. महाराष्ट्रात देखील भारत जोडो यात्रेला मोठा प्रतिसाद मिळावा यासाठी (Congress) काॅंग्रेसचे राज्यातील नेते झपाटून कामाला लागले आहेत. विशेषतः माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी या यात्रेच्या स्वागतासाठी जोरदार तयारी केली आहे.

याचाच एक भाग आणि राज्यात असलेली महाविकास आघाडी लक्षात घेता, अशोक चव्हाण व काॅंग्रेसचे प्रभारी एच.के. पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेऊन त्यांना भारत जोडो यात्रेचे निमंत्रण दिले आहे. आता राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत हे दोन्ही नेते सहभागी होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

भारत जोडो यात्रा राहूल गांधी यांची कित्येक किलोमीटरची पायपीट आणि त्यात सर्वसामान्यांना सोबत घेत ढवळून काढलेले वातावरण यामुळे जगभरात चर्चेत आहे. ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. तामिळनाडूतील कन्याकुमारी पासून सुरू झालेल्या या भारत जोडो यात्रेचा प्रवास केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, हरयाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि पंजाब असा असणार आहे.

ही यात्रा महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्याचा पहिल्या आठवड्यात साधरणतः ५ तारखेला दाखल होण्याची शक्यता आहे. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत समाजातील प्रत्येक घटक या यात्रेत सहभागी होतांना दिसतो आहे. राहूल गांधी यांचा या यात्रेतील साधेपणा सगळ्यांनाच भावत असल्याने महाराष्ट्रात देखील भारत जोडो यात्रेचे असेच जल्लोषात आगमन झाले पाहिजे, यासाठी माजी मंत्री व काॅंग्रेस नेते अशोक चव्हाण तयारीला लागले आहेत.

आगमी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजप विरोधात आघाडीचे प्रयत्न सुरू असतांना काॅंग्रेसच्या भारत जोडो यात्रेत राज्यातील आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष त्यात सहभागी होणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. भारत जोडो यात्रेचे निमंत्रण देण्यासाठी महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज शरद पवार व उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी यात्रेचे निमंत्रण स्वीकारले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT