Congress leader joins Shiv Sena in the presence of Chief Minister Eknath Shinde, Sarkarnama
महाराष्ट्र

BJP News : बावनकुळेंसोबत चर्चेच गुऱ्हाळ अन् शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश : काँग्रेस नेत्याने भाजपला दाखवला 'कात्रज'चा घाट

BJP News : ऑपरेशन लोटस अंतर्गत पुण्यात भाजपमध्ये डझनभर नेत्यांचा प्रवेश. महापालिका निवडणुकीआधी राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत.

Sudesh Mitkar

Pune News : ऑपरेशन लोटस अंतर्गत आज पुणे भाजपमध्ये तब्बल डझनभर नेत्यांचा प्रवेश घडवून आणण्यात आला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने विशेष करून उपनगरांमध्ये हे प्रवेश घडून आणले आहेत. एकीकडे भाजपाच्या पक्षप्रवेशाची धामधूम सुरू असतानाच दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये पुण्यातील काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याने प्रवेश केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये होणाऱ्या पक्षप्रवेशाच्या यादीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना पाहायला मिळत होती. त्यात काँग्रेसचे माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या पक्षप्रवेशाबाबत देखील चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळालं होतं. ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा सुरू होत्या. दरम्यानच्या काळामध्ये यांनी भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे देखील भेट घेतली होती. त्यामुळे पहिल्या टप्प्यांमध्ये बागुल यांचा देखील पक्षप्रवेश होणार असल्याचं बोललं जात होतं.

मात्र आज झालेल्या भाजपच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात आबा बागुल दिसले नाहीत. मात्र त्यानंतर अवघ्या काही तासातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आबा बागुल आणि त्यांचे पुत्र हेमंत बागुल यांनी प्रवेश केला आहे. रवींद्र धंगेकर यांच्यानंतर हा दुसरा सर्वात मोठा पक्षप्रवेश पुण्यातून शिंदेंच्या सेनेमध्ये झाला आहे. हे दोन्ही पिता-पुत्र आगामी महापालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.

त्यामुळे या पिता-पुत्राकडून भाजपमध्ये पक्षप्रवेश याबाबतच्या वाटाघाटी सुरू होत्या. भाजपने देखील काही अटींसह पक्षप्रवेश देण्याची तयारी दर्शवली असल्याचे देखील सांगितला जात. असं असताना अचानकपणे मंत्री उदय सामंत यांच्या मध्य स्थितीतून आबा बागुल यांनी शिंदेंच्या सेनेमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे बागुल यांनी भाजपला कात्रजचा घाट दाखवला असल्याच्या देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

बागुल गेले सहा टर्म काँग्रेसचे नगरसेवक राहिले आहेत. तसेच उपमहापौर म्हणून देखील त्यांनी काम पाहिला आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ते पर्वती मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. मात्र पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली त्यानंतर त्यांच्यावर पक्षाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. निवडणुकीत त्यांचा पराभव झाला मात्र या पराभवानंतर बागुल हे भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा सुरू होत्या. परंतु आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून त्यांनी भाजपला चकवा देत शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.

असं असलं तरी पुणे महापालिकेची निवडणूक शिंदेची सेना आणि भाजप हे एकत्रित महायुती म्हणून लढवणार आहेत. त्यामुळे महायुतीच्या जागा वाटपामध्ये आबा बागुल आणि त्यांच्या मुलासाठी भाजप जागा सोडणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT