Narendra Modi, Prithviraj Chavan sarkarnama
महाराष्ट्र

Prithviraj Chavan News: '...या दबावामुळेच मोदींनी 'ऑपरेशन सिंदूर' थांबवलं; पृथ्वीराज चव्हाणांच्या नव्या बॉम्बनं राजकारणात खळबळ

Congress Vs Modi Government: काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा खळबळजनक दावा केला आहे. त्यात त्यांनी अमेरिकेतील एपस्टीन फाईल्स या 19 डिसेंबर रोजी तिथल्या संसदेत खुल्या होणार आहेत. त्यातून समोर येणारी माहिती ही जगाला हादरवणारी असणार असल्याचं म्हटलं आहे.

Deepak Kulkarni

Pune News: अमेरिकेतील उद्योजक जेफ्री एपस्टीन प्रकरणाशी संबंधित गोपनीय कागदपत्रांमुळे देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. गोपनीय कागदपत्रे 19 डिसेंबरपर्यंत समोर येतील. त्यामध्ये भारतातील तीन आजी माजी खासदारांचा समावेश आहे," असा खळबळजनक दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी मंगळवारी(ता.16) केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'ऑपरेशन सिंदूर' कदाचित याच दबावामुळे थांबविले असल्याची शक्यता ही त्यांनी पुण्यात वर्तवली.

पुणे श्रमिक पत्रकार संघाकडून आयोजित केलेल्या वार्तापालात पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, "अमेरिकेच्या सिनेटने या प्रकरणातील गोपनीय कागदपत्रे एका महिन्यात खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. जेफ्री एपस्टीनवर मानवी तस्करी, अल्पवयीन मुलींचे शोषण, प्रेमाच्या जाळ्यात अडकवून गुप्त माहिती काढणे (हनी ट्रॅप) असे गुन्हे आहेत. यामध्ये अनेक राष्ट्राच्या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे.

त्यात भारतातील तीन आजी-माजी खासदारांचा समावेश असून, ही कागदपत्रे खुली झाल्यावर त्याचे गंभीर पडसाद देशातील राजकारणात उमटून पंतप्रधानपदी बदल होऊ शकतो,असंही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं.

काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा खळबळजनक दावा केला आहे. त्यात त्यांनी अमेरिकेतील एपस्टीन फाईल्स या 19 डिसेंबर रोजी तिथल्या संसदेत खुल्या होणार आहेत. त्यातून समोर येणारी माहिती ही जगाला हादरवणारी असणार असल्याचं म्हटलं आहे.

भारताच्या राजकारणावरही त्याचा मोठा परिणाम होईल, असा दावा काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. एपस्टीन नावाच्या व्यक्तीने जगातील अनेक लोकांना अल्पवयीन मुली पुरवल्यात, त्यामध्ये भारतातील काही जणांचा समावेश आहे. याचा मोठा परिणाम भारतीय राजकारणावरही होणार असून याच पार्श्वभूमीवर आगामी काळात देशाचा पंतप्रधान बदलला जाईल असा आपला तर्क असल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT