मुंबई : कॉग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागी होत असलेली राज्यसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता असल्याची शक्यता आहे. कॉग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी काल भाजपचे नेते, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर भाजपच्या उमेदवाराने अर्ज मागे घ्यावा, असे मत भाजपच्या काही नेत्यांनी व्यक्त केले असल्याचे समजते.
कॉग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या रजनी पाटील यांनी महाविकास आघाडीकडून राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना बिनविरोध निवडून यावे, यासाठी काल कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी काल देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. त्यानंतर ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असे मत व्यक्त होत आहे.
भाजपचे उमेदवार संजय उपाध्याय यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे. ते येत्या सोमवारी अर्ज मागे घेतील अशी शक्यता आहे. येत्या दोन दिवसात भाजपा कोअर कमिटीच्या बैठकीत उमेदवारी माघार घेण्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. काँग्रेसने घेतलेल्या पवित्र्यावरून महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेली शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून नाराजीचा सूर आळवला जात असल्याचे समजते. बिनविरोध निवडणुकीसाठी काँग्रेसनेत्यांनी भाजपसमोर लोटांगण घातल्याची भावना या घटक पक्षांकडून व्यक्त होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.