Sharad Pawar, Nana Patole, Uddhav Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

MVA News : 'मविआ'मध्ये जागावाटपावरून तिढा; काँग्रेसच्या नेत्यांची दिल्लीत धाव

Political News : महाविकास आघाडीतील घटक पक्षाचा जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याने रविवारी काँग्रेसच्या नेतेमंडळींच्या शिष्टमंडळाने दिल्लीत जाऊन हायकमांडशी चर्चा केली आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा आता कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असतानाच महायुती व महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे. त्यातच महाविकास आघाडीतील घटक पक्षाचा जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याने रविवारी काँग्रेसच्या नेतेमंडळींच्या शिष्टमंडळाने दिल्लीत जाऊन हायकमांडशी चर्चा केली आहे.

गेल्या महिनाभरापासून महाविकास आघाडीची जागावाटपासंदर्भात बैठका सुरु आहेत. मात्र, त्यामध्ये ठाकरे गट, काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये जागांवरून एकमत होत नसल्याचे चित्र आहे.

महाविकास आघाडीतल्या जागावाटपासंदर्भात माहिती देण्यासाठी काँग्रेस नेते नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात आणि वर्षा गायकवाड दिल्लीत गेले आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, राहुल गांधी, केसी वेणुगोपाल आणि रमेश चेन्निथला यांच्यासोबत ते चर्चा करणार असल्याचे समजते.

आघाडीतील जागवाटपावेळी उद्धव ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) 140 जागांवर दावा केला असून काँग्रेसने 130 जागांवर दावा केला आहे तर दुसरीकडे शरद पवार गटाने 80 जागांवर दावा केला असल्याचे समजतो. त्यामुळेच गेल्या काही दिवसापासून जागावाटपाबाबत महाविकास आघाडीमध्ये पेच निर्माण झाला आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये 288 पैकी एकूण 150 जागांचा तिढा सुटल्याची माहिती आहे. उर्वरित ज्या जागांवर वाद आहे. त्यावर पहिला राज्यातच तोडगा काढण्यात येणार आहे. जर तोडगा निघाला नाही तर दिल्लीमध्ये त्यावर तोडगा काढण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मुंबईतील 23 जागांचा तिढा सुटला

महाविकास आघाडीची मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. त्यामधील मुंबईतील जागांवर चर्चा करण्यात आली. 36 पैकी 23 जागांचा तिढा सुटला असून उरलेल्या 13 जागा कुणाच्या वाट्याला जाणार याची उत्सुकता लागली आहे. या 23 जागांपैकी शिवसेना ठाकरे गट 13, काँग्रेस 8 , राष्ट्रवादी 1 आणि समाजवादी 1 या जागेवर सर्वांचं एकमत झाल्याची माहिती आहे. घाटकोपर पूर्वची जागा राष्ट्रवादी पवार गटाला तर शिवाजीनगरची जागा समाजवादी पार्टीला मिळणार असल्याची माहिती सूत्राने दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT