Congress MLA with Venugopal
Congress MLA with Venugopal sarkarnama
महाराष्ट्र

राज्यातील 110 आमदार दिल्लीत...पण काॅंग्रेसच्या आमदारांनी उडविली खळबळ!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : संसदेच्या वतीने आमदारांसाठी दोन दिवसांच्य राष्ट्रकुल प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. त्यासाठी राज्यातील सर्वपक्षीय ११० आमदार दिल्लीला रवाना झाले आहेत. प्रशिक्षणासाठी राजधानीत पोहचले तरी राजकीय हालचाली मात्र जोरात सुरू आहे. त्यातच काँग्रेस आमदारांना पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना भेटण्याची ओढ असून राज्यातील स्वपक्षाच्या मंत्र्यांबाबत तक्रारीचा पाढा वाचणार असल्याचे समजते. (110 MLAs from Maharashtra in Delhi)

या भेटीची वेळ अद्याप मिळालेली नसून मंगळवारी दुपारी किंवा सायंकाळी सोनिया गांधी (Sonia Gandhi) बोलिवण्याची शक्यता आहे. काॅंग्रेसच्या आमदारांनी राज्यसभेती विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे, पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेतली. यात आमदार संग्राम थोपटे, अमित झणक, कैलास गोरंट्याल, सुरेश वरपूडकर, तुषार राठोड, बळवंत वानखेडे, अभिजित वंजारी, विकास ठाकरे यांचा समावेश होता. या आमदारांनी या नेत्यांकडेही आपले मनोगत सांगितल्याचे समजते. या नेत्यांकडे तक्रारी केल्या की नाही, याची माहिती मिळू शकली नाही. पण एका आमदाराने दिलेल्या माहितीनुसार तक्रारी अगोदरच झालेल्या आहेत.

काँग्रेस मंत्र्यांविषयी तक्रारी
महाविकास आघाडीसह भाजपचेदेखील आमदार या प्रशिक्षण शिबिरात सहभागी होणार आहेत. प्रशिक्षणापेक्षा काँग्रेस आमदारांना पक्षश्रेष्ठींशी संवाद महत्त्वाचा आहे. राज्यातील काँग्रेसचे मंत्री स्वपक्षाच्या आमदारांकडे दुर्लक्ष करत असून मतदारसंघातील विकास कामांना निधी मिळवून देण्यात असमर्थ असल्याचा रोष आमदारांचा आहे. आमदार कैलास गोरंट्याल यांनी तर थेट महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कार्यपद्धतीबाबतच सोनिया गांधी यांच्याकडे नाराजी व्यक्त करणार असल्याचे जाहीर सांगितले. तर, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही विदर्भ वगळता इतर भागातील आमदारांना दुय्यम वागणूक देत असल्याची तक्रार करणार असल्याचे सांगण्यात येते.

Congress MLAs meet Kharge


डिनर डिप्लोमसी
राज्यातून महाविकास आघाडीचे आमदार दिल्लीत येत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्यासाठी स्नेहभोजन ठेवले आहे. सत्ता स्थापनेनंतर अशा प्रकारे दिल्लीत प्रथमच शरद पवार आणि महाविकास आघाडीचे आमदार एकत्र येत असल्याने आघाडीतल्या समन्वयाचा संदेश यातून देण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनीही आमदारांसाठी स्नेहभोजनाचे नियोजन केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT