Nana Patole, Narendra Modi  Sarkarnama
महाराष्ट्र

Nana Patole News: गांधी कुटुंबाला मोदी सरकार घाबरते; पटोलेंची उडवली खिल्ली

Maharashtra Politics: ज्या लोकांची यांना भीती वाटते, त्यांना विविध यंत्रणांच्या माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Mangesh Mahale

Mumbai News: काँग्रेस नेते राहुल गांधी आता मणिपूर ते मुंबई अशी 'भारत न्याय यात्रा' काढणार आहेत, या यात्रेवर भाजपने टीकास्त्र डागले आहे. त्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. "मोदी सरकार गांधी कुटुंबाला घाबरत आहे. ज्या लोकांची यांना भीती वाटते, त्यांना विविध यंत्रणांच्या माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे," असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

नागपूर येथील काँग्रेसच्या कार्यक्रमाला सोनिया गांधी उपस्थित राहण्याची नसल्याचे पटोले यांनी सांगितले. सोनिया गांधी यांची तब्येत बरी नसल्याने त्या येऊ शकत नसल्याचे पटोले यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसने अध्यक्ष शरद पवार आणि अचलपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार बच्चू कडू यांची आज भेट झाली.

बच्चू कडू यांच्याविषयी नाना पटोले यांना विचारले असता ते म्हणाले, "बच्चू कडू यांच्याशी कोणत्याच विषयावर चर्चा झाली नाही किंवा त्यांनी संपर्क केलेला नाही, "आमदार भरत गोगावले यांना आपला स्वभाव बदलण्याचा सल्ला शिंदे गटातील नेते, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिला आहे. सामंतांच्या या सल्ल्याचा संदर्भ गोगावले यांना न मिळणाऱ्या मंत्रिपदाशी आहे का? अशी चर्चा आता रायगडमध्ये सुरु झाली आहे.

यावर नाना पटोले म्हणाले, "भरत गोगावले यांना सामंत काय म्हणाले, कोणता चिमटा काढला, याच्याशी आपल्याला काही घेणे देणे नाही. आज राज्यासमोर आणि देशासमोर यापेक्षा मोठे प्रश्न आहेत. त्यावर काँग्रेस काम करीत आहे,"

पवार यांच्या भेटीमुळे चर्चेत आलेले प्रहार जनशक्ती पार्टीचे नेते तथा अचलपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार बच्चू कडू यांनी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपले नेते आहेत. शिंदे हे जोपर्यंत महायुतीमध्ये आहेत, तोपर्यंत आपण त्यांना सोडून जाण्याचा प्रश्नच येत असल्याचे आमदार बच्चू कडू यांनी गुरुवारी (ता. 28) अमरावती जिल्ह्यातील कुरळपूर्णा या आपल्या गावी बोलताना स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT