Nana Patole Sarkarnama
महाराष्ट्र

Nana Patole : 'MVA'ची जागा वाटपाची फायनल तारीख ठरली; नाना पटोलेंनी मॅरेथॉन बैठकांचा विषय सांगितला

Nana Patole reaction to MVA seat allocation at a press conference in Mumbai : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबई येथे पत्रकार परिषदेत 'मविआ'च्या दोन दिवसांच्या मॅरेथॉन बैठकांमधील विषयांचे मु्द्दे सांगितले.

Pradeep Pendhare

Mumbai News : महाविकास आघाडीतील जागा वाटपाची निश्चित तारीख, मुख्यमंत्री पदाचा चेहरा, निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण विधानं केली.

या सर्वात महत्त्वाचे म्हणजे, महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची तारीख नाना पटोले यांनी सांगितली.

महाविकास आघाडीच्या मुंबईत उद्यापासून पुढील दोन दिवस मॅरेथॉन बैठका होणार आहेत. सोमवार (ता. 30) आणि मंगळवार (ता. 1), अशा दोन दिवसांच्या बैठकांमध्ये जागा वाटपावर सविस्तर चर्चा होणार आहेत. महाविकास आघाडीचे जागा वाटप मंगळवारी (ता. 1) पर्यंत निश्चित करण्याचा मानस आहे, असे काँग्रेसचे (Congress) नाना पटोले यांनी सांगितले.

मुख्यमंत्रीपदाचा चेहरा...

महाविकास आघाडी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल, यावर नाना पटोले म्हणाले, "जनतेसमोर आम्ही महाविकास आघाड म्हणून समोरे जात आहोत. लोकसभेला यांनी कितीही मोदी... मोदी... केलं, तरी जनतेनं ऐकलं नाही. शिंदे आणि फडणवीस हा काही महाराष्ट्राच्या जनतेसाठी मोठा इश्यू नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह (Amit Shah) महाराष्ट्रात जेवढे दौरे करतील, तेवढा महाविकास आघाडीला फायदा होईल".

'महाविकास आघाडीकडे चेहरा विचारात असेल, तर त्यांच्याकडे चेहराच नाही. हे खोक्यांचं सरकार आहे. धोक्याचं आणि अवकाळी चेहऱ्याचं सरकार आहे. मुख्यमंत्री सकाळी सांगतो, स्वतः नालेसफाईत भाग घेतला अन् सायंकळी मुंबई पाण्यात तुंबते. हे यांचा चेहरा आहे. महाविकास आघाडी म्हणून आमचा चेहरा आहे, तो आम्ही जनतेसमोर घेऊन जाणार आहोत', असे नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.

आयोगाची तंबी सर्वकाही सांगून गेली

निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात पत्रकार परिषद घेतली. तरी तारीख जाहीर केलेली नाही. नेमकं काय कारण असेल, याची विचार केली असताना, त्यावर नाना पटोले म्हणाले, "सरकारचा दबाव प्रशासन आहे. त्यामुळे प्रशासन काहीच करूच शकत नाही. निवडणूक आयोगाने जाता-जाता तंबी दिली आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्या करत नसाल, तर आचारसंहिता लागू देत, मग आम्ही निर्णय घेऊ". अशापद्धतीने निवडणूक आयोगाला निर्णय घ्यावा लागत असेल, तर याचा अर्थ महाराष्ट्रातील खोकेबाज, धोकेबाज, अवकाळी सरकार स्वतःच्या फायद्यासाठी किती मोठं पाप करत आहे, हे निदर्शनास येते, असा टोला नाना पटोले यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT