kalicharan Baba Arrested By Raipur Police

 

sarkarnama

महाराष्ट्र

महात्मा गांधींबाबत वादग्रस्त विधान ; कालीचरण बाबाला अटक

कालीचरण महाराज (kalicharan baba) याने रायपूर येथे आयोजित धर्मसंसद मध्ये महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते.

सरकारनामा ब्युरो

अकोला : अकोल्यातील मूळ रहिवासी असलेल्या कालीचरण महाराज (kalicharan baba) याने रायपूर येथे आयोजित धर्मसंसद मध्ये महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. संपूर्ण देशात याचे पडसाद उमटले. दरम्यान राजकीय-सामाजिक क्षेत्रातून निषेध नोंदविला जात आहे. कालीचरण बाबाला आज पहाटे मध्यप्रदेशातील खजुराहो शहरातून अटक करण्यात आली. (kalicharan Baba Arrested By Raipur Police)

अकोल्यात काँग्रेसच्या आंदोलनानंतर कालीचरण बाबावर कोतवाली पोलिसांनी भांदवीच्या कलम 294 आणि 505(2) अंतर्गत गुन्हा नोंदवला होता. दरम्यान या प्रकरणी कालीचरण महाराजाच्या वतीने अकोला जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आला आहे. जामीन अर्जावरील सुनावणी न्यायालयात पार पडल्यानंतर या प्रकरणी न्यायालयाने कालीचरण महाराज यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता.

अकोल्यात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात कालीचरण महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार अर्ज दिला होता. मात्र, पोलिसांनी तक्रार घेण्यास इन्कार केल्याने पदाधिकाऱ्यांनी ठाण्यासमोरच ठिय्या दिल्यानंतर अखेर साडे चार तासानंतर पोलिसांनी या अर्जाची दाखल घेऊन कालीचरण महाराजांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले होते.

छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील ‘धर्म संसद’ वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशभरातून धर्माचे अनुयायी आणि महामंडलेश्वर आले होते. यावेळी वक्त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरले आणि नथुराम गोडसेचे कौतुक केलं. या कार्यक्रमात महाराष्ट्रातल्या अकोल्याचे रहिवासी असलेल्या कालीचरण महाराज यांनीही महात्मा गांधींविषयी अपशब्द वापरले असल्याने संताप व्यक्त होत आहे.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात यावरुन गदारोळ माजला असून रा्ष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी कालीचरण महाराज यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीदेखील ट्वीट केलं असून अशा विषारी प्रवृत्तीला ताबडतोब अटक करा आणि ठेचून सुद्धा काढा अशा शब्दांत संताप व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT