पिंपरी : वाढत्या कोरोनामुळे राज्य सरकारने लॉकडाऊनची तयारी सुरु केली असताना दुसरीकडे तो लागू होण्यापूर्वीच त्याला भाजपकडून विरोध होऊ लागला आहे. याद्वारे ठाकरे सरकार भय पसरवीत असून त्यातून कमाई करण्याचा त्यांचा डाव असल्याचा आरोप बुधवारी (ता.५) सकाळी भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी केला होता. त्यानंतर काही तासांत लगेचच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीही कडक लॉकडाऊनला विरोध केला. तसेच तो लागू केला, तर जनता रस्त्यावर उतरेल, असा इशारा त्यांनी दिला. कडक निर्बंधांना मात्र, त्यांनी होकार दिला. जनजीवन ठप्प करून चालणार नाही. नाही तर लोकं वेडे होतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
कोरोना हा सध्या संपण्याच्या मार्गावर आहे. तसेच त्याचे स्वरुपही भयावह राहिलेले नाही. तो नॉर्मल सर्दी खोकल्यासारखा झाला आहे. आता कुठे दोन वर्षानंतर अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर यायला लागली आहे. त्यामुळे कडक लॉकडाऊनची गरज नाही. पण कडक निर्बंध टाका, त्यासाठी आमची काहीच हरकत नसेल, असे पाटील म्हणाले. पिंपरी-चिंचवडमधील विविध विकासकामांचे भुमीपूजन आणि उदघाटनानंतर ते बोलत होते.
कडक निर्बंधाना असहमती नाही, पण लॉकडाऊनला कोणी तयार होणार नाही. कारण दोन वर्षे त्यात सर्व वर्ग सफर झाला आहे. आणखी किती वर्षे सहन करणार. सगळं रुटीन चालू ठेवायचं, पण काळजी घ्यायची. कडक निर्बंध लादा. पण, शाळा, कॉलेज बंद ठेवून कार्यालयांतील उपस्थितीवर बंधने लादून काही होणार नाही,असे ते म्हणाले. पण, नियम सर्वांनी पाळले पाहिजेत. मोठे कार्यक्रम ड्रॉप केले पाहिजेत. पण छोटे कार्यक्रम व्हावेत, नियम पाळून ते केले पाहिजेत, असे ते म्हणाले. जनजीवन ठप्प करून चालणार नाही. नाही तर लोकं वेडे होतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक सक्षम करण्यासाठी सत्ताधारी भाजपा पदाधिकारी कटिबद्ध आहेत.असे मत पाटील यांनी विकासकामांच्या उदघाटनानंतर व्यक्त केले.यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, माजी शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप, उपमहापौर हिरानानी घुले, सत्तारूढ पक्ष नेते नामदेव ढाके, नगरसेवक संदीप कस्पटे, नगरसेविका आरती चौंधे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका सविता खुळे, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंधे आदी यावेळी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.