Strong winds and high waves seen along the Arabian Sea coast as Cyclone Shakti moves toward Oman, raising Maharashtra rain alert according to IMD Sarkarnama
महाराष्ट्र

Shakti Cyclone : कोकण किनारपट्टीवर 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं! पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, 'या' जिल्ह्यांचं टेन्शन वाढलं

Cyclone Shakti Update : अरबी समुद्रातील 'शक्ती' चक्रीवादळ ओमानच्या दिशेने पुढे सरकले असून पुढील काही तासांत ते अधिक तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या वादळामुळे गुजरात आणि महाराष्ट्राला जास्त नुकसान होणार नसलं तरी यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

Jagdish Patil

Shakti Cyclone : अरबी समुद्रातील 'शक्ती' चक्रीवादळ ओमानच्या दिशेने पुढे सरकले असून पुढील काही तासांत ते अधिक तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या वादळामुळे गुजरात आणि महाराष्ट्राला जास्त नुकसान होणार नाही.

मात्र महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाने शक्ती चक्रीवादळाचा 4 ते 7 ऑक्टोबर काळात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गवर प्रभाव पडणार असल्याचं सांगितलं आहे.

तसंच शक्ती चक्रीवादळामुळे विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर वादळाचा धोका लक्षात घेता समुद्रकिनाऱ्यांवर फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनीही अधिक खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे.

हे चक्रीवादळ वायव्य आणि ईशान्य अरबी समुद्रावर केंद्रित होते. ते द्वारकेपासून सुमारे 420 किमी अंतरावर होते. आता ते ओमानच्या मासिराह किनाऱ्याकडे सरकत असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.

वादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्रकिनाऱ्यांवर फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनीही खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाचे केलं आहे. समुद्राच्या पाण्यात उतरणे, किनाऱ्याजवळ फिरणं टाळण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT