Farmers against fuel pumps demanding 7/12 land records for diesel purchase in Parbhani. sarkrnama
महाराष्ट्र

Farmers Troubled : सातबारा दाखवा अन् डिझेल घ्या! पंपचालकांच्या अटीने शेतकरी हैराण, कृषीमंत्री भरणे संतापले

Diesel Controversy Dattatray Bharne: डिझेल टंचाईमुळे शेतकरी हैराण झाला आहेत. सातबारा दाखवून डिझेल घेण्याचे फलक परभणीतील पंपावर लागला आहे.

Roshan More

Dattatray Bharne News : इंधनटंचाईचा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. शेतीच्या कामासाठी इंधनाची आवश्यकता असणाऱ्या शेतकरी पेट्रोलपंपावरून डिझेल घेऊन जात असतात. मात्र, परभणीत 7/12 दाखवला तरच इंधन मिळणार असल्याचे पेट्रोल पंप चालकांनी सांगितले आहे.

शेतीची कामे सुरू असताना डिझेल टंचाईमुळे शेतकरी अधिच हैराण झाला आहे. त्यात सात बारा दाखवून देखील पुरेस डिझेल मिळत नसल्याची तक्रार शेतकरी करत आहेत.

आधीच अनेक पंपांवर नो स्टॉकचे फलक झळकत आहेत त्यातच काही ठिकाणी 7/12 दाखवा आणि इंधन मिळवा अशी अट लादल्याने संताप व्यक्त केला जातो आहे. डिझेल मिळवण्यासाठी शेतकरी सकाळपासूनच कॅन आणि वाहनांसह रांगेत उभे राहत आहेत.

चौकशीचे आदेश

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, अशी कुठलीही अट घालणे हा निश्चित प्रकारे चुकीचे आहे. कलेक्टरांना चौकशीचे आदेश दिला आहे. कुठल्याही प्रकारे इंधनाची टंचाई नाही. डिझेल, पेट्रोलचा खप 20 टक्क्यांनी खप वाढला आहे. त्यामुळे इंधनासाठी रांगा लावत आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की, पेट्रोल, डिझेलचा पुरेसा साठा आपल्याकडे आहे.

इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध

आपल्याकडे इंधनाचा पुरेसा साठ आहे. शेतकऱ्यांना घाबरण्याची कारण नाही. जे पंपचालक चुकीची माहिती देत आहेत अटी घालत आहेत त्यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांना सांगून कारवाई करण्यात येईल, असे देखील कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT