Dattatray Bharne Sarkarnama
महाराष्ट्र

Dattatray Bharne: शेतकऱ्यांना मिळणार आता 2 लाख रुपये! कृषिमंत्री भरणेंची घोषणा

Bharne announces ₹2 lakh for Farmer: सरकारकडून शेतकऱ्यांना 1 लाख रुपयांची अनुदान देण्यात येत होते. या अनुदानात आता वाढ करण्याचा निर्णय सरकारनेे घेतला आहे. अनुदाची रक्कम दुप्पट करण्यात आली आहे.

Mangesh Mahale

एकीकडे राज्यातील शेतकऱ्याचे पावसामुळे अतोनात नुकसान झाले आहे. सरकारने मदत जाहीर केली आहे. काही शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोहचण्यास सुरवात झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक काही दिवसावर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.

जगातील शेती अन् शेती उद्योगांचा अभ्यास करण्यासाठी राज्याच्या कृषी विभागाकडून परदेशी दौऱ्याचे आयोजन करण्यात येते, यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना 1 लाख रुपयांची अनुदान देण्यात येत होते. या अनुदानात आता वाढ करण्याचा निर्णय सरकारनेे घेतला आहे. अनुदानाची रक्कम दुप्पट करण्यात आली आहे. विद्यमान 1 लाख रुपयांच्या मर्यादेत शेतकऱ्यांना पुरेशी मदत मिळत नव्हती. त्यामुळे अनुदान मर्यादा दुप्पट करून 2 लाख रुपये करण्याचा निर्णय घेतला असल्याचे कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी सांगितले.

जगातील सर्वोत्तम शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांनीआपल्या शेतात वापरावे यासाठी परदेशी अभ्यास दौऱ्याचे कृषी विभागामार्फत आयोजन केले जाते. 2012 नंतरच्या काळात प्रवास, निवास आणि परकीय चलनातील दरवाढ लक्षात घेता, आता या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. शेतीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचा प्रयत्न या निमित्ताने करण्यात येणार आहे, असे दत्तात्रय भरणे म्हणाले.

परदेश दौऱ्यातून शेतकऱ्यांना काय मिळणार ?

  • शेतीप्रगत देशांत जाण्यची मिळणार संधी

  • उत्पादनवाढीच्या नवीन पद्धतींचे प्रत्यक्ष ज्ञान मिळावे

  • शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत

  • ठिबक सिंचन आणि जलव्यवस्थापन

  • कृषी उत्पादन प्रक्रिया व मूल्यवर्धन

  • अत्याधुनिक यांत्रिकी शेती

  • जैविक शेतीविषयी माहिती

  • दर्जेदार पिकांसाठी नवीन बाजारपेठा

  • अत्याधुनिक यांत्रिकी शेतची माहिती

  • निर्यात आणि विपणन या क्षेत्राचा अनुभव

  • शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत

या देशांचा समावेश

आतापर्यंत आपले शेतकरी फ्रान्स,अमेरिका, इस्रायल, जपान, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स थायलंड इत्यादी देशांतील शेतीतील नवकल्पना, सिंचन तंत्र, पिक उत्पादन व्यवस्थापन, कृषी प्रक्रिया उद्योग, मूल्यवर्धन आणि निर्यातक्षम शेतीपद्धती यांचा अभ्यास करून आलेले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT