Pune man files for Vice President of India: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक पुढील महिन्यात होणार आहे. जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यामुळे ही निवडणूक होत आहे. एनडीएने महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली आहे. तर, इंडिया आघाडीने माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, या निवडणुकीत आता पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात तरुणाने उडी घेतली आहे.
दौंड तालुक्यातील सहजपूर गावचा तरूण उमेश म्हेत्रे याने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेशने दिल्ली गाठली आणि उमेदवारी अर्ज दाखल केला. राज्यसभेच्या दालनात निवडणूक निर्णय अधिकारी पी.सी मोदी आणि गिरीमा जैन यांच्याकडे उमेशने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
दौंडमधील एका साध्या तरुणाने उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार अर्ज भरल्याने सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे उमेश याने याआधी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी देखील अर्ज दाखल केला होता. मात्र, उमेदवारी अर्जावर अनुमोदक म्हणून दहा आमदारांच्या सह्या आवश्यक असल्याने त्याचा उमेदवारी अर्ज बाद झाला होता.
उपराष्ट्रपतीपदासाठी संविधानामध्ये तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीनुसार उमेदवार हा भारताचा नागरिक असावा. सरकारी लाभ देणारे पद त्याच्याकडे नसावे अथवा तो सरकारी नोकरी करणार नसावा. त्याचे किमान वय 35 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार हा राज्यसभा निवडणुकीसाठी पात्र असावा.
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सीपी राधाकृष्णन आणि ही सुदर्शन रेड्डी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या उमेदवारांमध्येच लढत होण्याची शक्यता आहे. उमेश म्हात्रे याने उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी त्याचा अर्ज हा तांत्रिक कारणांमुळे बाद होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.