Manoj Jarange reaction Sarkarnama
महाराष्ट्र

Manoj Jarange reaction : असं काही झालं आहे, यावर मनोज जरांगेंचा विश्वास बसेना! खात्री करण्यासाठी अनेकांशी संपर्क अन् बातमी...

Ajit Pawar Dies in Pune-Baramati Plane Crash Manoj Jarange Reacts : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात झालेल्या निधनावर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

Pradeep Pendhare

Ajit Pawar death news : महाराष्ट्राच्या राजकारणाला शोकसागरात बुडवणारी घटना घडली असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी मुंबईहून ते बारामतीकडे विमानाने येत होते. त्याचवेळी हा घटना घडल्याने महाराष्ट्र हादरला आहे.

अजित पवार यांच्या निधनाच्या घटनेवर राज्यसह देशभरातून प्रतिक्रिया येत असतानाच, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. असं काही झालं आहे, यावर मनोज जरांगे पाटील यांचा अगोदर विश्वास बसत नव्हता. अनेकांकडे खात्री केली. त्यानंतर बातमी खरी असल्याचा धक्का बसला, अन् महाराष्ट्राचं कधीही भरून न येणारं नुकसान झालं, अजित पवार यांचे निधन ही बातमी मनाला पटतच नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमानाला बारामती इथं सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी इथं भीषण अपघात झाला. यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाला. अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्य शोकाकूल झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि असंख्य कार्यकर्ते बारामतीत पोहोचले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राहुल गांधी, नितीन गडकरी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी अजित पवार यांच्या निधनावर प्रतिक्रिया समोर आली आहे. जरांगे पाटील यांना अगोदर असं काही झालं आहे, यावर विश्वास बसला नाही. अनेकांकडे खात्री केली. त्यानंतर बातमी खरी निघाली. तरी यावर विश्वास बसत नाही. अजितदादांचे निधन ही बातमी मनाला पटत नाही. महाराष्ट्राचे या घटनेमुळे मोठे नुकसान झाले आहे. कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. संपूर्ण राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, "अजित पवार यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक खूप मोठी हानी झाली आहे. महाराष्ट्रातच नाही, तर देशात धाडसी निर्णय आणि त्या निर्णयावर काम करणारे अजित पवार हे मोठे नेते होते. अजित पवारांसारखा नेता पुन्हा होणे नाही. अजित पवार खूप मोठा सामाजिक, राजकीय आधार होते. काही केल्या ही बातमी मनाल पटत नाही."

'अजित पवार यांच्या स्पष्टवक्तेपणावर जरांगे पाटील यांनी आठवण काढत, स्पष्टपणे काम करणारा नेता, कोणाचे काम होणार असेल, तर होणार देणार, काम नसेल होणार, तर सरळ नाही म्हणून सांगायचे. अजित पवार यांच्या जाण्याने सर्वात जास्त नुकसान लोकांचे झाले आहे. अजितदादा सर्व जाती-धर्मांच्या लोकांचे काम करायचे. सामाजिक प्रश्नांची जाण असणारा नेता गेल्याने नेमकं काय बोलावं हे देखील कळत नाही,' असे जरांगे पाटील यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT