Narayan Rane sarkarnama
महाराष्ट्र

Narayan Rane : खासदारकीसाठी नारायण राणेंचे नाव सूचवताच धमक्या आल्या; शिवसेनेच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट, म्हणाले, 'मला...'

Deepak Kesarkar claims News : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे उभे राहावेत म्हणून मी त्यांचे नाव लोकसभा निवडणुकीपूर्वी सूचवले होते.

Sachin Waghmare

Ratnagiri News : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासोबत वाद होता. फारसे संबंध चांगले नसल्याने छोट्या-मोठ्या कारणाने वाद होत होता. मात्र, त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या सोबत आलो. त्यानंतर राज्यात अडीच वर्ष मंत्री होतो. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे उभे राहावेत म्हणून मी त्यांचे नाव लोकसभा निवडणुकीपूर्वी सूचवले होते. खासदारकीसाठी राणेंचे नाव सूचवणारा मी पहिलाच व्यक्ती होतो. पण मी राणेंचे नाव सूचवताच मला धमक्या आल्या. थेट मंत्रिपदावरून बोलले गेले, असा दावा माजी मंत्री दीपक केसरकर यांनी केला.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना दीपक केसरकर हे काहीकाळ मंत्री राहिले. यावेळी राणे आणि केसरकर यांच्यासोबत असलेले राजकीय वैमनस्य संपुष्टात आणले. या दोन्ही नेत्यांमध्ये दिलजमाई झाली. त्यानंतर केसरकर यांनी नारायण राणेंना तिकीट मिळावे म्हणून सर्वात आधी आवाज उठवला होता, असेही केसरकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

केसरकर यांनी राणे यांना लोकसभा निवडणुकीला उभे राहण्याचा आग्रह धरला. राणेंनीही सर्वांच्या आग्रहाखातर निवडणूक लढवून या निवडणुकीत विजय मिळवला. मी राणेंचं नाव सूचवताच मला धमक्या आल्या. थेट मंत्रिपदावरून बोलले गेले, मात्र त्याकाळी मी डगमगलो नाही, असेही दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.

सध्याच्या सरकारमध्ये मी मंत्री असलो नसलो तरी साईबाबांची कृपा माझ्यावर आहे. माझे चांगले चालू राहील. देवाच्या कृपेने आजोबा वडिलांचा वारसा आहे. माझे व्यवसायाकडे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळेच मंत्री नसणं कदाचित साईबाबांच्या मनात असेल. मी कुटुंबाकडे जे दुर्लक्ष केलं, त्याकडे लक्ष द्यावं असं साईबाबांना वाटत असेल. माझं कुटुंब म्हणजे स्वत:चं कुटुंब नाही, सावंतवाडीची जनता ही माझं कुटुंब आहे. एवढा कार्यक्रम असातनाही मी पहिलं प्राधान्य मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलला दिले आहे, असे केसरकर म्हणाले.

राणे यांच्या सोबतचे राजकीय वैर संपल्यानंतर पहिल्यादांच केसरकर यांनी त्यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. त्यांच्या कामाची पद्धती, मुख्यमंत्री म्हणून राणेंनी गाजवलेला काळ आणि राणेंचा आवाका यावर नेहमीच केसरकर भरभरून बोलत राहिले. कोणत्याही वादात जाणार नाही याची काळजी केसरकर यांनी घेतली. त्याला राणेंनीही चांगला प्रतिसाद दिला. याशिवाय राणेंच्या दोन्ही मुलांसोबतचं राजकीय वैमनस्यही केसरकर यांनी संपुष्टात आणले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT