New Dehli News : दिल्लीत आंदोलन करण्यासाठी जंतर-मंतर मैदानाऐवजी आता रामलीला मैदान, बुराडी मैदान आणि सीबीडी ग्राउंड ही तीन नवीन ठिकाणे निवडण्यात आली आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला असून दिल्ली पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव हा बदल केल्याचे स्पष्ट केले आहे. या निर्णयावर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी मैदान बदलल्याने प्रतिक्रिया देत केंद्र सरकारच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे.
जंतर मंतरला आंदोलनाच्या निश्चित स्थळांच्या यादीतून वगळल्याने केंद्र सरकारच्या कारभारावर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. गृह मंत्रालयाने सुरक्षेचे कारण देत आंदोलनासाठी ठिकाण बदलले आहे. यावर अभिजीत दीपके म्हणाले की, 'जंतर मंतर आता निदर्शनांचे ठिकाण राहिलेले नाही. कारण त्या भ्याड हुकूमशहाने त्याचे युद्धक्षेत्रात रूपांतर केले होते. आता संपूर्ण देश जंतर मंतर बनेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दिपके यांच्यानंतर यावर कॉकरोच जनता पक्षाचे प्रवक्ते सौरभ दास यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करून प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी लिहिले की, नरेंद्र मोदी जंतर मंतरला का घाबरतात? जंतर मंतर हे भारतातील लोकांचे आहे. गृह मंत्रालयाने भारतातील लोकांशी सल्लामसलत केली का? कोणत्याही हितधारकांशी सल्लामसलत केली का? कोणत्याही संघटनांशी सल्लामसलत केली का? हे गृहीत धरा की, ज्याप्रमाणे पंतप्रधान जनतेचे जंतर मंतर अधिसूचित करत नाहीत, त्याचप्रमाणे ते लवकरच भारतातील लोकशाहीही अधिसूचित करतील. हे पाऊल त्या दिशेने टाकलेली एक सुरुवात आहे. आम्ही हा मनमानी निर्णय स्वीकारत नाही. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याच्या आणि एकत्र येण्याच्या लोकांच्या मूलभूत हक्कावर हा हल्ला आहे. आता संपूर्ण देशच जंतर मंतर बनत आहे.
दिल्ली पोलीस आयुक्त अनुराग कुमार यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेला हा आदेश, २८ एप्रिल २०२२ रोजी जारी केलेल्या पूर्वीच्या आदेशात सुधारणा करतो. याअंतर्गत, जंतर मंतरला आंदोलनाच्या ठिकाणांच्या यादीतून वगळण्यात आले असून तीन नवीन ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये रामलीला मैदान, बुराडी मैदान आणि सीबीडी ग्राउंड येथे आंदोलने आयोजित करण्याची प्रक्रिया आणि नियमांची रूपरेषा दिली जाईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.