supreme court hairing  Sarkarnama
महाराष्ट्र

Shiv Sena Case : सुप्रीम कोर्टात ठाकरेंच्या वकिलांचा युक्तिवाद; थेट मुळावर घाव घालत म्हणाले, 'निवडणूक आयोगाकडे पुन्हा...'

Supreme Court Shiv Sena Case News : सुनावणीवेळी त्यांनी असंख्य उदाहरणे देत पक्ष सोडून गेलेल्या आमदारावर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Sachin Waghmare

New Dehli News : सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष व चिन्हावर गेल्या सुनावणी सुरु आहे. सुनावणीच्या सलग आठव्या दिवशी सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे वकील देवदत्त कामत यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. यावेळी त्यांनी काही मुद्दे उपस्थित करीत कोंडी करण्याचा प्रयत्न केला. सुनावणीवेळी त्यांनी असंख्य उदाहरणे देत पक्ष सोडून गेलेल्या आमदारावर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यासोबतच निवडणूक आयोगाकडे पुन्हा पाठवू नका, अशी विनंती युक्तिवादावेळी वकील देवदत्त कामत यांनी केली असल्याची माहिती सुनावणीनंतर प्रसार माध्यमाशी बोलताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी दिली.

कालावधी लोटल्यावर अपात्रतेवर निर्णय घेता येईल का ? असा सवाल सुप्रीम कोर्टाने विचारला होता. या कोर्टाच्या सवालावार वकील देवदत्त कामत यांनी असंख्य उदाहरणे दिली आहेत. पक्ष निरंतर असल्याचे सांगत त्यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. पक्ष सोडून गेलेल्या आमदारावर अपात्रतेची कारवाई करण्याची जोरदार मागणी त्यांनी केली. त्यासोबतच निवडणूक आयोगाकडे पुन्हा पाठवू नका, अशी विनंती केली. निवडणूक आयोगाने चुकीचा निर्णय घेतला असल्याने न्याय मागणीसाठी तुमच्याकडे आलो आहे. त्यामुळे तुम्ही परत आयोगाकडे पाठवू नका, अशी मागणी केली असल्याचे सावंत यांनी सांगितले.

दरम्यान, या सुनावणीवेळी विधानसभा अध्यक्षांनी ही केस योग्य प्रकारे हाताळली नाही. आमदारांनी मूळ पक्षातून फुटण्याचा निर्णय स्वतंत्रपणे घेतला होता, ते सगळे आमदार हे अपात्र ठरायला हवे होते, असा युक्तिवाद देवदत्त कामत यांनी केला. निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी चुकीचे निर्णय दिल्यानंतर ते निर्णय अनेकदा न्यायालयाने फिरवल्याचे अनेक दाखले देवदत्त कामत यांनी दिले.

निवडणूक आयोगाने विधिमंडळ बहुमताच्या आधारे शिंदेंच्या गटाला पक्ष आणि चिन्ह दिले. मात्र पक्षांतरबंदीच्या कायद्यान्वये ते सगळेच आमदार अपात्र ठरतात. त्यांनी पक्षत्याग जरी केला असला तरी ते अपात्र न ठरता, चिन्हाच्या आधारे लाभ उपभोगत आहेत. ते चिन्ह त्यांना मिळाले ते फक्त विधिमंडळातील बहुमताच्या आधारे. त्यामुळे शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी त्यावेळी पक्षत्याग केला की नाही याचा कायमचा निर्णय घ्यावा. त्यांनी जर पक्षत्याग केला असेल हे सिद्ध झाले तर आजही न्यायालय त्यांना अपात्र ठरवू शकते, असा मोठा युक्तिवाद देवदत्त कामत यांनी केला.

एकदा अपात्र ठरल्यानंतर संबंधित सदस्यांचे सदस्यत्व संपते. या प्रकरणात, ठरावीक कालावधीत या प्रकरणाची सुनावणी होऊ शकली नाही, त्यामुळे त्यांनी पक्षांतराचे फायदे आधीच घेतले आहेत. यासाठी आम्ही कोणालाही दोष देत नाही. पण आजही ते त्या पक्षांतराचे फायदे घेत आहेत, कारण निवडणूक चिन्हाबाबतचा आदेश विधिमंडळातील बहुमताच्या चाचणीच्या आधारावर कायम आहे, असे कामत म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT