Devendra Fadnavis And Pankja Munde Sarkarnama
महाराष्ट्र

Devendra Fadnavis And Pankja Munde : देवेंद्र फडणवीस-पंकजा मुंडे दिल्लीत एकत्र...

Jagdish Patil

Devendra Fadnavis And Pankja Munde : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांचा बोलबाला असल्याचं बोललं जात होतं. मात्र, पक्षांतर्गत राजकारणामध्ये पंकजाताईंचा बळी गेला. त्यांचा परळीत धनंजय मुंडेंविरोधात पराभव झाला. त्यानंतर विधानपरिषदेत त्यांना घेतलं नाही. त्यापलीकडे जाऊन त्यांचं राजकारण आता राहणार की नाही? असा प्रश्न असतानाच प्रितम मुंडे यांचा पत्ता कट करुन लोकसभेला बीडमधून पंकजाताईंना उतरवलं गेलं.

मात्र फुटीच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांनी डाव टाकला. पंकजा मुंडेंचा पराभव करण्यासाठी त्यांनी बजरंग सोनवणेंना बळ दिलं, अर्थात मुंडेना पराभूत करण्याचा त्यांचा हेतू नव्हता. मात्र भाजपला हरवण्याच्या उद्देशाने पवारांनी डाव टाकला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात असणारे सोनवणे खासदार होण्याचे इर्शेने शरद पवारांकडे आले आणि उमेदवारी मिळवली. आणि त्यांनी पंकजा यांना पराभूत केलं.

मुंडेच्या (Pankaja Munde) या पराभवामध्ये भाजपमधले काही बडे नेते असल्याचं बोललं गेलं. यामध्ये देवेंद्र फडणवीस आहेत का? अशीही चर्चा रंगली पण हेच फडणवीस आणि मुंडे मोदींच्या तिसऱ्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला एकत्र बसले होते. अर्थात दोघांचाही नूर पालटला होता. कारण परभणीत मुंडेचा पराभव आणि राज्याच्या राजकारणात फडणवीसांचा पराभव झाला आहे. मात्र दोघे एकमेकांच्या शेजारी बसले होते हे मीडियाच्या नजरेतून सुटलेलं नसून सध्या या दोघांच्या बैठक व्यवस्थेची चर्चा सुरु आहे.

नरेंद्र मोदी यांनी आज तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर राजनाथ सिंह यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तर तिसऱ्या क्रमांकावर अमित शहा यांनी शपथ घेतली. मोदींच्या शपथविधी सोहळ्याकजे अवघ्या जगाच्या नजरा लागल्या आहेत. या कार्यक्रमाला 7000 लोकांना निमंत्रण देण्यात आलं आहे. जगभरातील दिग्गज लोक या शपथविधी सोहळ्याला उपस्थित आहेत. यामध्ये अनेक उद्योगपती परदेशी पाहुणे यांसह बॉलिवूड कलाकारांचा समावेश आहे.

या कार्यक्रमाला 7000 लोकांना निमंत्रण देण्यात आलं आहे. जगभरातील दिग्गज लोक या शपथविधी सोहळ्याला उपस्थित आहेत. यामध्ये अनेक उद्योगपती परदेशी पाहुणे यांसह बॉलिवूड कलाकारांचा समावेश आहे. राज्यातील भाजपचे अनेक मंत्री या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे यांच्यासह महायुतीच्या अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती. यावेळी देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे एकमेकांशेजारी बसल्याचं पाहायला मिळालं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT