राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार चर्चेत आलेल्या लाडकी बहीण योजनेचा प्रभाव आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही ठळकपणे दिसू लागला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्या प्रचार सभांमध्ये या योजनेला कायम ठेवणार असल्याचे आश्वासन देत आहेत. लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळेच राज्यात महायुतीची सत्ता आली आहे.
काही दिवसापुर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना आश्वासन देत जोपर्यंत एकनाथ शिंदे आहे, तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही, असे सांगितले होते. आता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही लाडक्या बहिणींना कोणत्याही परिस्थितीत योजना बंद होणार नाही, असा शब्द दिला आहे. .
हिवरखेड येथील सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले. त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबांसाठी घर, शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. महाराष्ट्रातील नव्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाले असून लोकांमध्ये या योजनेबाबत शंका निर्माण झाली होती. मात्र, जोपर्यंत मी मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, असा शब्द त्यांनी राज्यातील बहिणींना दिला.
या सभेत फडणवीस यांनी अयोध्येतील राममंदिराच्या कळस आणि धर्मध्वज अनावरणाचा उल्लेख करत हा दिवस विशेष असल्याचे सांगितले. अयोध्येत जसा भगवा फडकला, तसा हिवरखेड, तेल्हारा आणि अकोट नगरपालिकांवरही भाजपाचा भगवा फडकवावा, असे आवाहन त्यांनी जनतेला केले. गावांना जास्त लक्ष देताना शहरांची उपेक्षा झाल्याने अनेक शहरांतील परिस्थिती बिघडल्याचे ते म्हणाले. प्रत्येक शहराच्या विकासासाठी आमच्याकडे स्पष्ट योजना असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नाशिकच्या सटाणा येथील सभेत लाडकी बहीण योजनेवर भूमिका स्पष्ट केली. त्यांनी विधानसभेत बहिणींनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच मोठा विजय मिळाल्याचे सांगत विरोधकांवर टीका केली. लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्यांनी कोर्टात जाऊन अडथळे आणण्याचा प्रयत्न केला, मात्र ही योजना कधीच बंद होऊ देणार नाही, असा शब्द त्यांनी दिला. केवायसीची अडचणही दूर करण्याचे आश्वासन त्यांनी सभेतून जाहीर केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.