Eknath Shinde gets setback from Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

Devendra Fadnavis Vs MNS : एकनाथ शिंदेंना मोठा झटका, शिवसेनेच्या मंत्र्याचा निर्णय CM फडणवीसांनी फिरवला, ठाकरेंनी मुद्द्यालाच हात घातला!

Devendra Fadnavis Changes Pratap Sarnaik : मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलेल्या निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी बदलत मराठी शिक्षण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. त्यावरून अमित ठाकरेंनी सरकारवर टीका केली आहे.

Roshan More

Fadnavis Shinde MNS latest political news: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलेला निर्णय फिरवला आहे. ऑटो-टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठी शिकण्यासाठी सरनाईक यांनी 15 ऑगस्टपर्यंतची मुदत दिली होती. त्यानंतर एका महिन्याची मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर कारवाई होणार असे सरनाईक म्हणाले होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा निर्णय बदलत ऑटो-टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी वर्षभराची मुदतवाढ दिली आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फिरवून योग्य तो संदेश दिल्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्णयानंतर नागपूर दौऱ्यावर असलेल्या अमित ठाकरेंनी जोरदार टीका केली. ते म्हणाले, आणखी दहा पंधरा वर्षे मराठी भाषा शिकण्याची मुदत द्या. आगामी काळात उत्तर प्रदेशात निवडणूक होणार आहे. हीच निवडणूक लक्षात घेऊन फडणवीस सरकारने हा निर्णय घेतला आहे.

गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृह येथे ऑटो-टॅक्सी चालक संघटनेच्या प्रतिनिधींनी भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रात व्यावहारिक मराठी आलीच पाहिजे, याला पूर्ण समर्थन असल्याचे संघटनेच्या प्रतिनिधींनी नमूद केले. तसेच व्यावहारिक मराठी शिकण्यासाठी प्रयत्न सुरू असून, त्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यावहारिक मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देत, या कालावधीत यासंदर्भात कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याचे आश्वासन दिले.

शिवसेनेत नाराजी?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे. मात्र, त्यांनी संबंधित मंत्र्याला विश्वासात घेत चर्चा करून हा निर्णय घ्यायला हवा होता, अशी चर्चा शिवसेनेत आहे. मराठीच्या मुद्यावर एकनाथ शिंदेंची शिवसेना ठाकरेंच्या शिवसेनेच्या समोर ठाकली आहे. अशा स्थितीत मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिंदेंना टार्गेट केले जाऊ शकेत, अशी भीती देखील व्यक्त केली जात आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेकडून टोला

संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयावर बोलताना म्हटले की, देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या इतर सहकारी पक्षांना आणि सरकारमधील सहकाऱ्यांना ठासून सांगायला हवं होतं की, मी तुमचा बॉस आहे आणि मी जे करीन तेच या मंत्रिमंडळात अंतिम असेल. मुख्यमंत्री हा सरकारचा नेता असतो. त्यामुळे तुम्ही कितीही दिल्लीमध्ये जाऊन फुगड्या घातल्या, तरीही मी इथे बॉस आहे आणि माझा निर्णय अंतिम राहील, हे त्यांनी काल रिक्षाचालकांच्या संदर्भातील निर्णयातून दाखवून दिलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT