Mumbai News : महायुती सरकारचा ग्रँड शपथविधी सोहळा गुरुवारी(ता.5) मुंबईतील आझाद मैदानावर पार पडला. या सोहळ्यात महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदे हेदेखील शपथ घेतली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या शपथविधीकडे लागलेलं होतं.
देवेंद्र फडणवीस यांनी महायुती (Mahayuti) सरकारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रमुख उपस्थितीत राज्यपालांनी फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. त्यांच्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनीही शपथ घेतली. शिंदेंनंंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
देवेंद्र फडणवीस यांनी अनोखा विक्रम करतानाच उपमुख्यमंत्री पदावरून मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.असे फडणवीस हे राज्याच्या इतिहासातील एकमेव मुख्यमंत्री ठरले आहेत. मागील अडीच वर्षे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये फडणवीस आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती.
महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह अनेक मोदी सरकारमधील मंत्री उपस्थित होते. तसेच अनेक राज्यांचे मुख्यमंत्री यांच्यासह राजकीय, बॉलिवूड, क्रीडा, सामाजिक, उद्योग आदींसह विविध क्षेत्रांमधील दिग्गज मंडळी आझाद मैदानावर उपस्थिती लावली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.