Devendra Fadanvis  Twitter/@Devendra Fadanvis
महाराष्ट्र

काहीच राहिलं नाही..पाणीच पाणी आहे : देवेंद्र फडणवीस

गेल्या २ वर्षांपासून सातत्याने काही ना काही संकट शेतकऱ्यांवर येत आहेत. त्यामुळे तातडीने आणि भरघोस मदत त्यांना मिळाली पाहिजे.

सरकारनामा ब्युरो

आधी अतिवृष्टी आणि त्यात भर म्हणून गुलाब च्रकीवादळाने राज्यात चांगलाच धुमाकूळ घातला. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना या वादळाचा तडाखा बसला. या नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका बसला तो मराठवाड्याला. या पार्श्वभुमीवर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर आज, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेडच्या दौऱ्यावर आहेत.

या दौऱ्याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, नुकसानग्रस्त भागातील दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतल्या, त्यांच्याशी संवाद साधला. त्यांचे प्रश्न निश्चितपणे सरकार दरबारी मांडणार आहोत. स्थानिक प्रशासनाशी सुद्धा मी चर्चा करणार असल्याचे फडणवीसांनी यावेळी सांगितले.

- यवतमाळ दौरा

देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यासह काही सहकाऱ्यांनी आज यवतमाळ दौरा केला. यवतमाळ येथील निळापूर येथे पुराच्या पाण्यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कापूस आणि सोयाबीनचे अतिशय चांगले पीक असताना संपूर्ण नुकसान झाले आहे. कापसाची बोंड पूर्णतः काळी पडली असल्याची माहिती यावेळी फडणवीस यांनी दिली.

ही विशेष परिस्थिती आहे. त्यामुळे विशेष मदत शेतकऱ्यांना राज्य सरकारने तातडीने केली पाहिजे. गेल्या २ वर्षांपासून सातत्याने काही ना काही संकट शेतकऱ्यांवर येत आहेत. त्यामुळे तातडीने आणि भरघोस मदत त्यांना मिळाली पाहिजे.

आमच्या काळात पीक विमा आणि नुकसानीची अशी दोन्ही प्रकारची मदत मिळत होती. आता मात्र केवळ घोषणा आणि आदेश निघतात. पण कोणतीही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. सरकार म्हणते पंचनामे झाले की मदत करू, पण पंचनामे होतानाही कुठे दिसत नाही, असे म्हणत त्यांनी प्रशासनावर ताशेरे ओढले.

वाशिम दौरा

वाशिम जिल्ह्यातील शिवणी रोड तसेच पिंप्री येथे पावसाच्या पाण्यामुळे नुकसान झालेल्या शेताची आज पाहणी केली. राजगाव येथे सुद्धा अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. वरून हिरवे आणि आतमध्ये हळद पूर्णपणे सडली आहे. वाशिममध्येही शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना तातडीने मदतीची गरज आहे.

त्यानंतर अमरावती जिल्ह्यातली मोझरी गावातील नुकसान पाहणी केली. येथे सोयाबीनचे झालेले नुकसान पाहून मन सुन्न झाले. काहीच राहिलं नाही..पाणीच पाणी आहे... त्यातही संतापजनक म्हणजे पैसे घेतल्याशिवाय नुकसान भरपाई मिळणार नाही. हे त्यांना अधिकाऱ्यांकडून मिळणारे उत्तर. आधीच आमचा शेतकरी संकटात, त्यात हे दुहेरी संकट, असही यावेळी देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT