Maharashtra Politics : अजित पवारांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील राजकीय गणितं बदलतं आहेत. दोन्ही राष्ट्र्वादीच्या विलीनकरणाबाबत चर्चा सुरू आहेत. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा दिल्ली दौऱ्यावर गेल्याने महाराष्ट्राच्या राजकरणात मोठे बदल होणार का? याची चर्चा सुरू झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीला गेले होते. या भेटीत त्यांनी भाजपचे नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन नवीन यांच्या भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्री फडणवीस हे एका वृत्तावाहिनीच्या कार्यक्रमासाठी दिल्लीत गेले असले तरी राजकीय पडद्यामागे नक्कीच काही तरी हालचाली झाल्या असणार, अशी देखील चर्चा सुरू आहे.
दरम्यान,राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत भाजपची भूमिका काय आहे, याबाबत वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होणार, स्थानिक पातळीवरील भाजपची भूमिका काय आहे याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहे.
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी विलीनकरणाविषयी अनौपचारिक गप्पांमध्ये मोठी माहिती दिली आहे. ते म्हणाले, 'विलीनीकरणाचा विषय अजून आमच्यापर्यंत आला नाही. तूर्तास विलीनीकरण हा विषय नाही.पुढे बोलताना प्रस्ताव आला तर पाहू.'
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.