Devendra Fadnavis statement on DJ in Maharashtra Sarkarnama
महाराष्ट्र

Pune DJ News : विद्यानंद बापटांच्या लढ्याला यश, पुण्यातून ‘डीजे’ आऊट होणार? पोलीस आयुक्तांसोबतच्या चर्चेनंतर CM फडणवीसांचे मोठे संकेत

Vidyanand Bapat Marathi Controversy News : पुण्यातील कोरेगाव पार्क येथे उभारण्यात येणाऱ्या कॅम्पसचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला.

सरकारनामा ब्युरो

Pune News : "मी पुणे पोलिस आयुक्‍तांशी बोललो असता त्‍यांनी ज्‍या गोष्‍टींचा लोकांना त्रास होतो त्‍या न करण्‍यावर एकमत होत असल्‍याचे सांगितले आहे. ‘डीजे’ चा भूकंप आल्‍यासारखा आवाज होतो तो होऊ नये यावर एकमत आहे. त्‍यानुसारच पुण्‍यात गणेशोत्सवासह इतर उत्‍सव साजरे होतील", असं म्हणत यंदाच्या पुण्यातील गणेशोत्सवातून डीजे आऊट होणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

पुण्यातील कोरेगाव पार्क येथे बजाज फिनसर्वच्या आर्थिक सेवा व्यवसायांसाठी उभारण्यात येणाऱ्या कॅम्पसचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. यावेळी बजाज फिनसर्वचे अध्यक्ष संजीव बजाज, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यानंतर बोलताना फडणवीस यांनी डीजेविरोधी मोहिमेबद्दल आणि डीजेबंदीबाबत भाष्य केले.

फडणवीस म्हणाले, सण, उत्‍सव साजरे करताना वर्षानुवर्षे काही पद्धती पडतात. त्‍या केवळ कायद्याच्‍या बडग्‍याने बंद करता येत नाहीत. कायदा वापरावा लागतो त्‍याचबरोबर लोकांना विश्‍वासात घेऊन त्‍यातून मार्ग काढावा लागतो. मी आज पुणे पोलिस आयुक्‍तांशी बोललो असता त्‍यांनी ज्‍या गोष्‍टींचा लोकांना त्रास होतो त्‍या न करण्‍यावर एकमत होत असल्‍याचे सांगितले आहे. ‘डीजे’ चा भूकंप आल्‍यासारखा आवाज होतो तो होऊ नये यावर एकमत आहे. त्‍यानुसारच पुण्‍यात गणेशोत्सवासह इतर उत्‍सव साजरे होतील.

ध्वनिप्रदूषणाबाबत चर्चेतूनच मार्ग काढून नंतर त्‍याचे राज्‍यासाठी धोरण तयार करायचे आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले. दहीहंडीमध्‍ये देखील मंडळे व पोलिस एकत्र येऊन मार्ग काढतील असे ते म्‍हणाले. बापट यांच्‍यावर झालेल्‍या हल्ल्याबाबतही त्‍यांनी नाराजी व्‍यक्‍त केली. हिंसा ही काही योग्‍य नाही. प्रत्‍येकाला आपापला मुद्दा मांडण्‍याचा हक्‍क आहे, असे ते म्‍हणाले.

बापटांच्‍या मराठी भाषेचे मुख्यमंत्रीही झाले ‘फॅन’

विद्यानंद बापट यांच्‍या मराठीचे सर्वत्र कौतुक होत आहे. याबाबत मुख्‍यमंत्री फडणवीस यांना विचारले असता त्‍यांनीही बापट यांच्‍या मराठी भाषेचे कौतुक केले. ‘बापट अतिशय सुंदर मराठीत बोलतात. मराठीच्‍या शुद्धतेचा नमुना त्‍यांच्‍या बोलण्‍यातून दिसत असून त्‍यांची मराठी ही ट्रेंडिंग आहे. त्याबद्दल त्‍यांचे कौतुक आहे.

मात्र, विचार मांडताना इतरांनाही त्‍याचा फार त्रास होणार नाही हे देखील बापट यांनी पाहायला हवे. जसे ते शुद्ध मराठीत मांडतात तसे ते सर्वसमावेशक पद्धतीने मांडतील,’ अशी अपेक्षा मुख्‍यमंत्री फडणवीस यांनी व्‍यक्‍त केली. केवळ बापटच नाही तर जो कोणी प्रमाण मराठी भाषा बोलतो ती ऐकून आनंद वाटतो. तसेच, बापटांची मराठी समजून घेण्‍यासाठी ट्युशन लावावी लागेल असा मिश्कील टोलाही त्‍यांनी या वेळी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT