शरद पवार यांनी आरक्षणाच्या विषयावर चिंता व्यक्त केलीय
यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावत आहे
या वक्तव्यांमुळे महाराष्ट्रातील आरक्षण राजकारण अधिक तापलं आहे.
Mumbai News : नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जेष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या समस्या, शेतमालाच्या किमती यावर भाष्य केलं. त्यांनी राज्यातील राजकीय अस्थिरता आणि सामाजिक ऐक्याला धोका निर्माण झाल्याचा दावा देखील केला आहे. तसेच राज्यात सुरू असलेल्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नांवर चिंता व्यक्त केली. याच चिंतेवरून आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावेळी त्यांनी एका वाक्यात याचे उत्तर दिले. ते म्हणाले, पवार साहेब जेष्ठ नेते आहेत. पण ते जेव्हा X म्हणतात तेव्हा त्यांचा इशारा Y आहे असे समजावं असा टोला लगावला आहे.
पक्षाच्या शिबीरात शरद पवार यांनी, राज्यातील स्थितीवर चिंता व्यक्त केली. त्यांनी मराठा आणि ओबीसी वादावर देखील भाष्य केले. सध्याच्या आरक्षणाच्या मुद्द्यामुळे महाराष्ट्र अस्थिर झाला आहे. त्यामुळे आता महायुती सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करावा. त्याबाबत निर्णय घ्यावा. गॅझेटमधील शब्द न शूब्द दोनदा मी वाचले आहेत. त्यामुळे सुरु असलेल्या वादाने सामाजिक वीण उसवतेय की काय अशी चिंता वाटतं असल्याचे शरद पवार म्हणाले.
यावर फडणवीस यांनी, पवार साहेब कशा करता प्रसिद्ध आहेत? हे तुम्हालाही माहिती आहे. त्यांनी जेव्हा X म्हटलं त्यावेळी Y म्हटलं आहे हे समजायचं. ते मोठे नेते आहेत. यामुळे अधिक काय बोलणार", असाही टोला फडणवीस यांनी लगावला.
याचवेळी फडणवीस यांनी आपला रोख विरोधकांवर वळवत जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी, मराठी समाजासाठी आपण निर्णय घेतला असून ओबीसीला धक्का लागणार नाही. ओबीसीत एकही नकली व्यक्ती जाणार नाही. याची काळजी घेतली जाईल. तसा जीआरच राज्य सरकारने काढल्याचे सांगत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना बोलण्याचा अधिकारच नसल्याची टीका केली आहे.
तसेच जे आज बोलत आहेत. त्यांनी समाजासाठी काहीच केलेलं नाही. ओबीसींसाठी जे काही करायचं होतं जे काही केलं ते आमच्याच सरकारने केलं आहे. असाही दावा फडणवीस यांनी केला आहे. 2014 असो किंवा आता आमच्याच सरकारने ओबीसी समाजासाठी निर्णय घेतले आहेत.
मग ते ओबीसींचं वेगळं मंत्रालय असो कीओबीसींसाठी योजना, महाज्योती असो की ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह योजना आम्ही सुरू केल्या आहेत. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न देखील आम्हीच सोडवला. त्यामुळे ओबीसी समाजालाही ओबीसींचं हित पाहणारं कोण? हे चांगलं माहिती आहेत. विरोधकांना फक्त केवळ राजकारण करता येतं, असंही फडणवीस म्हणाले.
प्र.1: शरद पवारांनी काय विधान केलं?
उ.1: त्यांनी महाराष्ट्रातील आरक्षण प्रश्नावर चिंता व्यक्त केली.
प्र.2: देवेंद्र फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली?
उ.2: त्यांनी टोला लगावत म्हटलं की पवारांनी X म्हटलं की Y समजायचं.
प्र.3: हा वाद कोणत्या विषयावर पेटला?
उ.3: हा वाद आरक्षणाच्या प्रश्नावरून पेटला.
प्र.4: या वादामुळे काय परिणाम होऊ शकतो?
उ.4: महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आणखी तापू शकतं.
प्र.5: कोणत्या दोन नेत्यांमध्ये हा वाद रंगला आहे?
उ.5: शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.