Maharashtra survey : महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य म्हणून भाजप नेते, कार्यकर्त्यांकडून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतले जाते. सध्या ‘देवाभाऊ’च्या नावाचा डंका महाराष्ट्रभर वाजत आहे. पण त्याची खरी सुरूवात २०१४ मध्ये झाली. महाराष्ट्राचे मुख्यमत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली अन् देवाभाऊ पर्व सुरू झाले. मुख्यमंत्रिपदाची ही पहिली पाच वर्षे अजूनही लोकांच्या मनात घर करून असल्याचे एका सर्व्हेतून समोर आले आहे.
महायुती सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त ‘सकाळ माध्यम समूहा’ने एक सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून कोणता कार्यकाळ आपणांस प्रभावी वाटतो?, असा प्रश्न महाराष्ट्रातील लोकांना विचारण्यात आला होता. त्यामध्ये चार पर्याय देण्यात आले होते.
देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रिपदाची ही दुसरी टर्म आहे. त्यानुसार सर्वेक्षणामध्ये २०१४ ते २०१९ आणि २०२४ नंतरचा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ असे दोन स्वतंत्र पर्याय देण्यात आले होते. त्याचप्रमाणे राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना फडणवीस २०१९ ते २०२२ या कालावधीत विरोधी पक्षनेते होते. त्यांतर २०२२ ते २०२४ मध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणूनही कारकीर्द गाजवली. हे दोन पर्यायही देण्यात आले होते.
महाराष्ट्रातील जनतेने फडणवीसांच्या पहिल्या टर्मच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाला सर्वाधिक पसंती दिली आहे. राज्यातील ३६.५ टक्के लोकांना त्यांचा हा कार्यकाळ सर्वाधिक प्रभावी वाटतो. त्यानंतर विरोधी पक्षनेतेपदाचा कार्यकाळ प्रभावी असल्याचे सांगणाऱ्या लोकांचे प्रमाण २५.५ टक्के एवढे आहे.
मुख्यमंत्रिपदाची दुसरी टर्म प्रभावी वाटते, असे म्हणणाऱ्या लोकांचे प्रमाण २२.८ टक्के इतके आहे. फडणवीसांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाला १५.२ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. २०१४ ते २०२५ या ११ वर्षांच्या त्यांच्या राजकीय वाटचालीत प्रत्येक टप्प्यावर ‘देवाभाऊं’नी आपला ठसा उमटविल्याचे सर्व्हेतून दिसते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.