Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : ठाकरेंमुळे सोडला, शिंदे-पवारांमुळे पुन्हा मिळाला; तब्बल 6 वर्षांनी फडणवीसांचे 'वर्षा' बंगल्यावर कमबॅक

Devendra Fadnavis News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (30 एप्रिल) 6 वर्षांनंतर पुन्हा 'वर्षा' या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान राहायला गेले आहेत.

Hrishikesh Nalagune

Devendra Fadnavis News : राज्याचे सत्ताकेंद्र पुन्हा एकदा वर्षा बंगल्याकडे सरकले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (30 एप्रिल) 6 वर्षांनंतर पुन्हा 'वर्षा' या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान राहायला गेले आहेत. अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर गृहप्रवेशाची छोटेखानी पुजाही संपन्न झाली. स्वतः अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरून याबाबतची माहिती दिली आणि गृहप्रवेशाचे फोटोही शेअर केले.

दरम्यान, गृह प्रवेशादिनीच फडणवीस दाम्पत्याला आनंदाची बातमीही मिळाली. नुकताच 'आयसीएसई' बोर्डाने दहावीचा निकाल जाहीर केला. यात त्यांची कन्या दिविजा 10 वीच्या परीक्षेत 92.60 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे. त्यामुळे फडणवीस कुटुंबियांसाठी आजचा दिवस अत्यंत आनंदाचा ठरला.

फडणवीस 6 वर्षांनंतर पुन्हा वर्षा बंगल्यावर :

देवेंद्र फडणवीस 2014 साली मुख्यमंत्री झाल्यानंतर वर्षा बंगल्यावर राहण्यासाठी गेले होते. पण 2019 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती तोडल्याने फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री होता आले नव्हते. त्यामुळे त्यांना वर्षा बंगला सोडावा लागला होता. त्यानंतर मुख्यमंत्री झालेले उद्धव ठाकरे इथे राहण्यासाठी आले होते.

तर विरोधी पक्षनेते झालेल्या देवेंद्र फडणवीस यांना मलबार हिल परिसरात असलेला सागर बंगला देण्यात आला होता. इतर सगळ्या बंगल्यांच्या तुलनेत सागर बंगला लहान आहे. त्यामुळे फडणवीस या बंगल्यावर रहायला जाईपर्यंत हा बंगला फारसा चर्चेत नव्हता. मात्र मागच्या सहा वर्षांच्या काळात घडलेल्या प्रचंड राजकीय घडामोडींचे केंद्र सागर बंगलाच राहिला.

महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाल्यानंतरही फडणवीस यांनी सागर बंगलाच मिळावा अशी मागणी केली होती. त्यानुसार त्यांना तोच बंगला कायम ठेवण्यात आला होता. आता विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने घवघवीत यश मिळविले. फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले. पण त्यानंतरही ते बरेच दिवस वर्षा बंगल्यावर राहण्यासाठी गेले नव्हते.

मुलगी दिविजा दहावीला होती. तिच्या अभ्यासावर परिणाम होऊ नये म्हणून ते सागरवरच थांबले होते. पण आता मुलीची दहावीची परीक्षा संपून निकाल लागताच पुन्हा वर्षा बंगल्यावर राहायला गेले आहेत. त्यामुळेच उद्धव ठाकरेंमुळे वर्षा सोडावा लागला होता. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याजोडीने निवडणूक जिंकल्याने त्यांना वर्षा बंगला पुन्हा मिळाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT