Sanjay Raut - Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

MVA on fadnavis News : फडणवीसांचं कौतुक ते ही कुणी-कुणी करावं ? राऊत, अंधारे, कोल्हेनंतर अन् आता...

Devendra Fadnavis supporters News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतूक सामन्यातून झाल्यानंतर आता महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये फडणवीसांचं कौतुक करण्याची स्पर्धाच लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : राज्यात अडीच वर्षापूर्वी शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर भाजपच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले होते. त्यावेळेसपासून सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यामुळे राजकीय वातावरण गढूळ झाले होते. विशेषतः विरोधकांकडून सत्ताधारी मंडळींवर खालच्या पातळीची टीका केली जात होती.

विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठ्या फरकाने विजय मिळवल्याने राज्याच्या राजकारणाने कूस बदलल्याचे दिसत आहे, त्यामुळे राज्यातील राजकारण बदलण्याचे संकेत मिळत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतूक सामन्यातून झाल्यानंतर आता महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये फडणवीसांचं कौतुक करण्याची स्पर्धाच लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

दोन दिवसापूर्वीच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सामना या मुखपत्रात देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले होते. देवेंद्र फडणवीस यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला गडचिरोली दौरा केला. नक्षलप्रभावग्रस्त या भागात फडणवीस यांनी दौरा करुन एक आदर्श निर्माण केल्याचे सामनामध्ये म्हटले होते. त्याच्या एका दिवसापूर्वीच सामन्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे डिप्रेशनमध्ये असल्याचे म्हटले होते. म्हणजे शिवसेना उबाठाकडून फक्त फडणवीस यांचे कोतुक करण्यात येत असून शिंदे यांच्या शिवसेनेवर मात्र टीकेचे बाण सोडले जात असल्याने त्याची सध्या जोरात चर्चा आहे.

एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे सामनातून कौतुक करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही फडणवीस यांच्या कामांची प्रशंसा केली आहे. त्यानंतर लगेचच ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी देखील फडणवीस यांची स्तुती केली. सर्वच महाविकास आघाडीतील घटक पक्षाकडून फडणवीस यांचे कौतुक केले जात असल्याने महाराष्ट्रातील राजकारण भविष्यात बदलणार का याची उत्सुकता लागली आहे.

सामनाच्या अग्रलेखातून फडणवीस यांच्या कारभाराचे कौतूक झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतूक केले. त्यानंतर अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे यांनीही कौतूक केले. संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आमचा पक्ष नेहमी सत्य मांडत असते. फडणवीस यांचा गडचिरोली दौरा राज्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे म्हटले आहे. सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, महाराष्ट्र सरकारमध्ये कोणी चांगले काम करत असेल तर त्यात फक्त देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेता येईल.

विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या कौतुकावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, माझ्या कामांचे कौतूक करणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो. दुसरीकडे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून उद्धव ठाकरे यांची राजकीय अडचण असल्याचे म्हटले आहे.

बदलत्या राजकारणाचे संकेत?

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांच्याकडून फडणवीस यांचे कौतूक करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला जोरदार फटका बसला. भाजपसोबत संबंध चांगले निर्माण करण्याचा हा शिवसेना उबाठाचा प्रयत्न आहे. बदललेले हे राजकारण आगामी युती, आघाडीचे संकते आहे का? हे भविष्यात स्पष्ट होणार आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT