NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते काल रात्री गृहमंत्री अमित शाह यांना दिल्लीत भेटले. शाह यांना भेटलेल्या नेत्यांच्या शिष्टमंडळात मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री छगन भुजबळ तसेच प्रफुल पटेल, सुनील तटकरेंसह दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे हे देखील होते.
गृहमंत्री अमित शाह यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भेट घेण्यामागचे अधिकृत कारण समोर आले नाही. मात्र, केंद्रात आणि राज्यात मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याने ही भेट असल्याचे चर्चा आहे. त्यामुळे धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील यांना मंत्रिपद मिळेल, असे देखील बोलले जात आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे हे यांनी राजीनामा दिला होता. तर, पुन्हा सरकार आल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांना पुन्हा मंत्रिपद मिळालेले नव्हते. अजित पवारांच्या निधनानंतर परिस्थिती बदलली असल्याने अनुभवी दिलीप वळसे पाटील मंत्रिमंडळात असले पाहिजे, असे राष्ट्रवादीच्या समर्थकांना वाटते. तर, धनंजय मुंडे यांच्यावर देखील आता गंभीर आरोप नाहीत. त्यामुळे त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळेल,असा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जातो आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्यामागे अर्थखाते हे पु्न्हा राष्ट्रवादी मिळावे, अशी मागणी केल्याची देखील माहिती आहे. अजित पवारांच्या निधनानंतर अर्थखाते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे ठेवले होते. आता, अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीला मिळाल पाहिजे यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फडणवीस यांची भेट घेतली होती. आता नेत्यांनी थेट गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निवास्थान देवगिरी येथे देखील आज राष्ट्रवादीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत विधान परिषद पदवीधर मतदारसंघात झालेला पराभव, आगामी मंत्रिमंडळ विस्तार आदी मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.