Dhananjay Munde Gym Video : माजी मंत्री, परळीचे विद्यमान आमदार धनंजय मुंडे राजकारणात पुन्हा जोरदार कमबॅक करण्याच्या तयारी असल्याची चर्चा आहे. जीममध्ये व्यायाम करत असतानाचा व्हिडिओ त्यांनी आपला सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत त्यांनी एक कविता देखील पोस्ट केली आहे. त्यामध्ये 'हरवण्याची आता बिशाद कुणाची…,' अशा ओळी असणारी ही कविता आणि धनंजय मुंडेंचा व्हिडिओ राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर मुंडे हे काहीसे बॅकफूटवर गेले होते. वाल्मिक कराड हा तुरुंगात आहेत. त्यानंतर प्रकृतीचे कारण देत मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देखील दिला होता. त्यानंतर त्यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया देखील झाल्याचे सांगितले जात होते.
महाराष्ट्राच्या राजकारणत आक्रमक चेहरा म्हणून धनंजय मुंडे ओळखले जात होते. मात्र, मागील काही काळापासून ते आक्रमकपद्धतीने राजकारण करत नसल्याची चर्चा होती. मंत्रिमंडळ विस्तार होणार धनुभाऊंना संधी मिळणार, असे त्यांचे समर्थक सातत्याने सांगत होते. मात्र, त्यांचे मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही आणि मुंडेंना संधी मिळाली नाही.
मात्र आता धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आपण पुन्हा नव्या दमाने राजकारण करणार असल्याचा संदेशच या व्हिडिओतून दिल्याचे तसेच आरोग्यावर फोकस केल्याचे संकेत असल्याची चर्चा आहे.
काटे खोलवर रुतले आहेत,
तरी पाऊल पुढे टाकतो आहे…
भेगाळलेले पाय आणि घायाळ मन;
अजूनही धैर्य टिकवून आहे…
निंदा-दूषणे आता न भिडती,
अडखळत मार्ग काढतोच आहे…
हरवण्याची आता बिशाद कुणाची…
स्वतःशी सुद्धा लढतो आहे…
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.