Dhananjay Munde Devendra fadnavis sarkarnama
महाराष्ट्र

Devendra fadnavis : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठं वक्तव्य, म्हणाले, अण्णा हजारेंचा आदर पण...

CM Fadnavis Statement News : चहापान कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोरच मोठे वक्तव्य केले.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरूवात होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महायुतीचे जवळपास सर्वच प्रमुख नेते उपस्थित होते, तर दुसरीकडे विरोधकांकडून चहापानावर बहिष्कार घातला होता. राज्यात गेल्या 2 महिन्यांपासून कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यावर चहापान कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोरच मोठे वक्तव्य केले.

केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. तर या हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडेंचा (Dhananjay Munde) निकटवर्तीय असल्याने विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मंत्री मुंडे यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. तर, संतोष देशमुख हत्याप्रकरणात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर देखील त्यांनी तीव्र भावना व्यक्त करत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी बीड जिल्हयातील अनेक नेत्यांनी केली आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. त्यावरून पत्रकार परिषदेत पत्रकाराने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ⁠अण्णा हजारे यांनी देखील धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला पाहिजे असे वक्तव्य केले होते, यावरून सवाल विचारला असता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अण्णा हजारे यांचा आम्ही आदर करतो, आमची यावर चर्चा झाली आहे. ⁠ज्यावेळी वाटेल नैतिकतेचा मुद्दा उपस्थित होतो, त्यावेळी मात्र भूमिका घेतली जाईल.⁠ आम्ही यावर खूप काही चर्चा केली आहे, असे स्पष्ट शब्दात मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले.

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात सरकारने आधीच भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच, माणिकराव कोकाटे यांचे प्रकरण न्यायालयीन आहे, कोर्टाचा निकाल आल्यानंतर त्याबाबत आम्ही भूमिका घेऊ, असेही फडणवीसांनी स्पष्ट केले. त्यामुळे, सरकारमधील दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या चर्चेला त्यांनी पूर्णविराम दिला.

चहापान कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार मात्र...

विरोधकांनी रविवारी झालेल्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता. मात्र, गेल्या कॅबिनेट बैठकींना गैरहजर राहिलेले धनंजय मुंडे चहापान कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी त्यांचा चहा पितानाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. त्यामुळे, सध्यातरी धनंजय मुंडेच्या राजीनाम्याबाबत सरकारच्या मनात काहीही नसल्याचे दिसून येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT