Mumbai Latest News : मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर मंगळवारी भ्रष्टाचाराच्या आरोपांवर मौन सोडले. मागील काही दिवसांपासून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून मुंडेंवर आरोप केले जात होते. आज त्यांनी पत्रकार परिषदेत अनेक मुद्दे मांडत धनंजय मुंडेंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. मुंडेंनीही काही तासांतच त्यावर पलटवार केला आहे.
मुंडे यांनी सांगितले की, दमानियांनी केलेले आरोप घेऊन आधीच एक ठेकेदार मुंबई हायकोर्टात गेला आहे. त्याच मुद्द्यावर कोर्टाने काही मुद्दे काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. तेच आरोप दमानियांनी केल्याचा दावा मुंडेंनी केला. दमानियांना विचारून प्रत्येक गोष्टीची किंमत ठरवायची का, असा सवालही मुंडेंनी केला.
डीबीटीमध्ये काय असावे आणि काय नसावे, याचे संपूर्ण अधिकार कृषी मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे आहेत. या प्रक्रियेमध्येही त्याचाच अवलंबून केला आहे. वित्तमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या पूर्ण मान्यतेने ही प्रक्रिया अंतिम केलेली आहे. मार्च 2024 मधील निविदा प्रक्रिया नियमांत व शासनाच्या धोरणाला अनुसरून राबवण्यात आली आहे. निविदा प्रक्रियेत अधिकाधिक कंपन्यांनी सहभागी व्हावे, यासाठी दोनदा मुदतवाढ दिली, असे मुंडेंनी सांगितले.
एप्रिल व मे महिन्यांत लोकसभेची आचारसंहिता व खरीप हंगाम लक्षात घेऊन विविध वस्तूंची खरेदी प्रक्रिया मार्च महिन्यांत करण्यात आली. नॅनो खतांबाबत सर्वात जास्त प्रोत्साहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागील दोन-तीन वर्षांपासून सुरू केले आहे. या देशात पंतप्रधानांनी प्रोत्साहन दिल्यानंतर महाराष्ट्र हे देशातील पहिले असे राज्य आहे जिथे ४ लाख शेतकऱ्यांना नॅनो खत दिले. त्याची खरेदी केंद्रीय कंपनीकडून झाल्याची माहिती मुंडेंनी दिली.
नॅनो खतांची खरेदी कमी दरात करण्यात आली. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत नॅनोची किंमत एकच आहे. यामध्ये कसल्याही प्रकारचा खोटेपणा किंवा भ्रष्टाचार नाही. केवळ मला बदनाम करण्याचे काम दमानिया यांनी हाती घेतले आहे. नॅनो युरिया किंवा नॅनो डीएपीचे दर देशभरात समान आहेत. त्यामुळे यामध्ये भ्रष्टाचार झाला असे म्हणणे म्हणजे शेतकऱ्यांना, माध्यमांनाही फसवण्यासारखे आहे, असा पलटवार मुंडेंनी केला. पंप खरेदी, कापूस साठवणूक बॅग खरेदीबाबतही दमानियांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यावरही मुंडेंनी स्पष्टीकरण दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.