Gopichand Padalkar Sarkarnama
महाराष्ट्र

Dhangar Reservation Video : धनगर आरक्षणचा प्रश्न पेटणार; 23 तारखेला राज्यभर आंदोलन

Roshan More

Dhangar Reservation : धनगड आणि धनगर शब्दाबाबत राज्य सरकार जीआर काढण्याच्या तयारी आहे. तर, आदिवासींमधून धनगर समाजाला आरक्षण देऊ नका म्हणून आदिवासी आमदार आक्रमक झाले आहेत. मात्र, धनगर समाजाला एसटीमध्ये समावेश झाल्यास आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागत नसल्याचा दावा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

गोपीचंद पडळकर म्हणाले, एसटीसाठी सात टक्के आरक्षण आहे. एनटीमध्ये धनगर समाजाला तीन टक्के आरक्षण आहे. ते एसटीमधून द्या. सुप्रीम कोर्टाने निर्देश दिल्याने अ आणि ब अशी वर्गवारी करत धनगर समाजाला आरक्षण दिले जाऊ शकते.

महाराष्ट्रात धनगड जमात अस्तित्वात नाही. धनगर राज्यात आहेत, हे देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिज्ञापत्र दिले होते. हायकोर्टानेसुद्धा आमची याचिका फेटाळली होती.आम्ही गेल्या सहा महिन्यापासून आंदोलन करत हा मुद्दा मांडत आहोत.

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी 23 तारखेला राज्यात मोठा रास्ता रोको करा, धनगर आरक्षणसाठी एकत्र या, रात्र वैऱ्याची आहे आता आंदोलन तीव्र करा, असे आवाहन गोपीचंद पडळकर यांनी केले.

सरकार जीआर काढणार

गोपीचंद पडळकर म्हणाले, सरकार जीआर काढण्याच्या तयारी आहेत. त्यासाठी कागदपत्रे आम्ही देत आहोत. ज्या प्रकारे आदिवासी नेते आरक्षण बाबत आक्रमक होत आहेत. तर धनगर नेते सुद्धा आक्रमक होतील.

'ते' दाखले रद्द करा

धनगड जातींचे दाखले ज्यांना दिले आहेत ते खोटे आहेत ते रद्द करा.राज्यात फक्त धनगर आहेत. धनगड नाही.त्यामुळे तात्काळ धनगड जातींचे प्रमाणपत्र असलेल्याचे दाखले रद्द करा, अशी मागणी देखील गोपीचंद पडळकर यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT