dhananjay munde Sarkarnama
महाराष्ट्र

Dhananjay Munde News : कृषिमंत्री धनंजय मुंडेंबाबत मोठी अपडेट; मुंबईत पार पडली पित्ताशयाची शस्त्रक्रिया

Political News : मुंबईतील सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात धनंजय मुंडे यांच्यावर पित्ताशयाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मागील दोन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते.

Sachin Waghmare

Mumbai News : राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना पोटदुखीचा त्रास झाल्याने चार दिवसापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चार दिवसांपासून गिरगाव येथील रिलायन्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून पित्ताशयाच्या त्रासामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

धनंजय मुंडे (Dhanjay Munde) यांना गेल्या अनेक दिवसांपासून पित्त आणि पोटदुखीचा त्रास होत होता. त्यानंतर सततचे दौरे, सभा, कामकाज यामुळे प्रकृतीकडे त्यांचे दुर्लक्ष होत होते. मात्र, गेल्या काही दिवसापासून पोटदुखीचा त्रास वाढल्याने त्यांना शस्त्रक्रिया करावी लागली.

मुंबईतील सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात धनंजय मुंडे यांच्यावर पित्ताशयाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मागील दोन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. त्यांची पित्ताशयाची पिशवी काढण्याची शस्त्रक्रिया रविवारी पार पडली. त्यांना उपचारासाठी 24 जुलैला दवाखान्यात दाखल करण्यात आले होते, त्यानंतर 26 जुलैला त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. धनंजय मुंडे यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.

त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde), माजी खासदार प्रीतम मुंडे यांनी देखील रुग्णालयात जाऊन बंधू धनंजय मुंडे यांची भेट घेतली. त्यासोबतच त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

मुंबईच्या गिरगाव भागातील सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात मुंडेंच्या पित्ताशयावर डॉ. अमित मायदेव यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांनी त्यांना आणखी चार ते पाच दिवस रुग्णालयातच विश्रांती आणि पुढील उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे.

मुख्यमंत्र्यांनी केली तब्येतीची विचारणा

शस्त्रक्रियेनंतर धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची दूरध्वनीवरून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विचारपूस केली. त्यासोबतच प्रकृतीची काळजी घेण्याचा सल्ला यावेळी त्यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT