MP Omprakash Rajenimbalkar  Sarkarnama
महाराष्ट्र

MLC Election : ठाकरेंना सोडण्याआधी ओम राजेनिंबाळकरांनी मोठा डाव टाकला होता; विधानपरिषदेच्या निकालनंतर सगळंच गणित समोर, किती मते फुटली?

Political News : धाराशिव-लातूर- बीड विधानपरिषद मतदारसंघातून भाजपचे बसवराज पाटील मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.

Sachin Waghmare

Mumbai News : विधानपरिषद निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. त्यामुळे आता निवडणुकीतील दगा फटाक्याची चर्चा रंगली आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोडून शिंदे सेनेच्या वाटेवर असलेले धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी विधानपरिषद निवडणुकीत काय भूमिका घेतली होती याची चर्चा आता रंगली आहे. धाराशिव-लातूर- बीड विधानपरिषद मतदारसंघातून भाजपचे बसवराज पाटील मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. तर काँग्रेसच्या महेश देशमुख यांचा पराभव झाला. या निकालावर नजर टाकल्यास याठिकाणी महाविकास आघाडीची मते फुटल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे मते फुटल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

राज्यातील विधानपरिषदेच्या 17 पैकी 11 जागांवरील निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यामध्ये धाराशिव-लातूर- बीड विधान परिषद मतदारसंघातून भाजपचे (BJP) बसवराज पाटील विजयी झाले. महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांचा पराभव झाला असून त्यांना महाविकास आघाडीचे मते फुटल्याचा मोठा फटका बसला आहे.

धाराशिव बीड लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात एकूण 988 मते आहेत. प्रत्यक्षात झालेले मतदान 983 इतके आहे. त्यापैकी भाजप महायुतीचे बसवराज पाटील यांना 844 मते मिळाली. तर महाविकास आघाडीचे महेश देशमुख यांना 125 मते मिळाली आहेत. तर 14 मते बाद ठरली आहेत. महाविकास आघाडीची 125 मते फुटली आहेत. यातील बहुतांश ही बसवराज पाटील यांच्याकडे गेली आहेत. त्यामुळे भाजपच्या बसवराज पाटील यांचा 721 मतांनी विजय झाला. हा राज्यातील सर्वाधिक मताधिक्याने झालेला विजय आहे. सर्वाधिक मतदार 367 हे लातूर जिल्ह्यात होते, 317 मतदार हे धाराशिव जिल्ह्यातील आहेत. सर्वात कमी 304 मतदार बीड जिल्ह्यात आहेत.

धाराशिव-लातूर- बीड विधान परिषद मतदारसंघातील निकालावर नजर टाकल्यास याठिकाणी महाविकास आघाडीची (MVA) मते फुटल्याचे स्पष्ट होत आहे. ओमराजे निंबाळकर यांनी रविवारी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जाण्याची घोषणा केली. मात्र, त्यांचा हा निर्णय अगोदरच ठरला होता. ते शेवटपर्यंत माझ्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी बोलून मी शिंदे गटात जायचे की नाही, हा निर्णय घेईन, असे सांगत होते.

विधान परिषदेची निवडणूक 18 जूनला झाली होती. त्यामुळे खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी धाराशिवमधील आपली सर्व मते भाजपच्या बसवराज पाटील यांच्याकडे वळवल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत ओम राजेनिंबाळकर यांनी दगाफटका केल्यामुळे महाविकास आघाडीची तब्बल 125 मते फुटल्याचा अंदाज आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT