IAS Officers Kirti Kiran Pujar and Shobha Jadhav in Viral Dance Video Sarkarnama
महाराष्ट्र

Dharashiv IAS officer video : पावसाचा हाहाकार; जिल्हाधिकारी पुजार, उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांच्या नृत्याचा व्हिडीओ व्हायरल

Dharashiv Flood Situation: Rain Havoc Creates Crisis : शेतकरी संकटात असताना सगळ्यांनीच त्याकडे संवेदनशीलपणे पाहायला हवे. सांस्कृतिक कार्यक्रम आधी ठरलेला होता. पण अशा परिस्थितीत तो रद्द करून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत देता येऊ शकली असती, असे ओमराजे निंबाळकर म्हणाले.

सरकारनामा ब्यूरो

थोडक्यात महत्वाचे :

  1. पावसामुळे संकट: मुसळधार पावसामुळे धाराशिव जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

  2. व्हिडिओ व्हायरल: अशा गंभीर परिस्थितीत जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांच्या नवरात्रोत्सवातील नृत्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

  3. टीकेची झोड: खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील आणि संजय राऊत यांच्यासह अनेकांनी अधिकाऱ्यांच्या असंवेदनशील वर्तनावर तीव्र टीका केली आहे.

IAS Officers Kirti Kiran Pujar and Shobha Jadhav in Viral Dance Video : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. शेतीचे अतोनात नुकसान झाले असून शेतकरी संकटात सापडला आहे. धाराशिव जिल्ह्यालाही मोठा फटका बसला आहे. अशातच धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांच्या नृत्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यावरून टीकेची झोड उठली आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमात गुरूवारी रात्री कीर्ती किरण पुजार आणि शोभा जाधव हे सहभागी झाले होते. त्यावेळचा हा व्हिडीओ असल्याचे सांगितले जात आहे. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या व्हिडीओवरून संताप व्यक्त केला. ते म्हणाले, धाराशिवच्या इतिहासात इतक्या प्रचंड प्रमाणात पुराची स्थिती यापूर्वी मागील शंभर वर्षात कधी झाली नाही.

शेतकरी संकटात असताना सगळ्यांनीच त्याकडे संवेदनशीलपणे पाहायला हवे. सांस्कृतिक कार्यक्रम आधी ठरलेला होता. पण अशा परिस्थितीत तो रद्द करून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत देता येऊ शकली असती. अधिकारी म्हणून संवेदनशीलता जागृत ठेवणे आवश्यक होते. पहिल्या दिवशी माझा पहाटे फोन उचलणारे हेच जिल्हाधिकारी होते. ते प्रशंसनीय आहे. पण अशाप्रकारे कुठलीही संवेदनशीलता दिसेल, असे तुमच्या कृतीत दिसू नये, अशी विनंती खासदारांनी केली.

आमदार कैलास पाटील यांनीही टीका केली. ते म्हणाले, अद्याप पंचनामे पूर्ण झालेले नाही. बेजाबदार वर्तन करणे अयोग्य आहे. शासनाचे प्रमुख अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांचे वर्तन शासनाचे वर्तन समजले जाईल. धाराशिवला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही, अशावेळी जिल्हाधिकाऱ्यांचे हे वर्तन योग्य नसल्याची टीका कैलास पाटील यांनी केली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत म्हणाले, ‘सरकार असंवेदनशील असल्याने प्रशासनही वाईटपध्दतीने असंवेदनशील झाले आहे. सरकारचा धाक नाही’. जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत विचारले असता त्यांनी माहिती घेऊन यावर बोलेन, असे सांगितले.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

Q1: हा व्हिडिओ कधीचा आहे?
A: नवरात्रोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यानचा असल्याचे सांगितले जात आहे.

Q2: सर्वात आधी कोणत्या नेत्यांनी टीका केली?
A: खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सर्वात आधी संताप व्यक्त केला.

Q3: धाराशिवमध्ये पूरस्थिती किती गंभीर आहे?
A: मागील १०० वर्षांत इतका प्रचंड पूर प्रथमच आला असल्याचे सांगितले जात आहे.

Q4: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काय प्रतिक्रिया दिली?
A: त्यांनी माहिती घेऊन यावर बोलेन, असे सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT