Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis departing for New Delhi following the sudden resignation of Dharmendra Pradhan. Sarkarnama
महाराष्ट्र

Devendra fadnavis : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर CM देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना! नेमकं कारण काय?

Dharmendra Pradhan Resigns Devendra fadnavis : केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेल्याची चर्चा आहे.

Roshan More

Devendra fadnavis News : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याचे वृत्त समोर येताच राजकारणात मोठी खळबळ उडाली. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तातडीने दिल्लीला रवाना झाल्याची माहिती आहे. या विषयीचे वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांचा हा नियोजित दौरा होता की त्यांनी दिल्लीला बोलावून घेण्यात आले, याची माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, आज आषाढी वारी असल्याने महापूजा करण्यासाठी मुख्यमंत्री आपल्या पत्नीसह पंढपूरमध्ये होते. मात्र, महापूजेनंतर ते दिल्लीला रवाना झाल्याची माहिती आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या या दिल्लीला जाण्याचे मागचे नेमके कारण समजू शकले नाही. दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर संजय राऊत यांनी ट्विट करत मोदी-शहा देखील जातील, असे म्हटले आहे.

ठाकरे बंधूंचा मोर्चा होणार...

धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आणि जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे उद्या (रविवारी) मुंबईत मोर्चा काढणार होते. मात्र, आता प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे ठाकरे बंधू काय निर्णय घेतात याची चर्चा आहे. दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाकरे बंधू हे उद्याचा मोर्चा काढणार आहेत. हा विजयी मोर्चा असेल, असे सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT