Disha Salian, Aaditya Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Disha Salian case : दिशा सालियानच्या वडिलांनी दिलेल्या 500 कोटींच्या नोटिशीला आदित्य ठाकरेंचे 26 पानांचे सडेतोड उत्तर; नेमके काय म्हणाले?

Aaditya Thackeray News : सतिश सालियान यांनी पाठवलेल्या 500 कोटींच्या नोटिशीमधील सर्व आरोप आदित्य ठाकरे यांनी फेटाळून लावले आहेत. ठाकरेंनी 26 पानांचे सडेतोड उत्तर देत हे सर्व आरोप तथ्यहीन असल्याचे स्पष्ट केले आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : दिशा सालियन मृत्यू प्रकरणी हायकोर्टाच्या आदेशानंतर सीबीआयकडून गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याने राजकीय घडामोडीना वेग आला आहे. दिशा सालियानचे वडील सतीश सालियान हे सातत्याने आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करताना दिसत आहेत. त्यातच चार दिवसापूर्वी सतीश सालियन यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विरोधात 500 कोटींचा अब्रु नुकसानीचा दावा करणारी नोटीस मातोश्रीवर जाऊन वकिलांकडे दिली होती. सतिश सालियान यांनी पाठवलेल्या 500 कोटींच्या नोटिशीमधील सर्व आरोप आदित्य ठाकरे यांनी फेटाळून लावले आहेत. ठाकरेंनी 26 पानांचे सडेतोड उत्तर देत हे सर्व आरोप तथ्यहीन असल्याचे स्पष्ट केले आहे.

सतिश सालियान यांनी शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांना 500 कोटींची नोटीस पाठवली होती. या नोटीसीला अखेर आता आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिले आहे. आदित्य ठाकरे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आदित्य ठाकरेंकडून सतिश सालियान यांच्या कायदेशीर नोटिशीला उत्तर देण्यात आले आहे.

सर्व आरोप आदित्य ठाकरेंनी फेटाळले

नोटिशीमधील सर्व आरोप आदित्य ठाकरेंनी फेटाळून लावले आहेत. 16 सप्टेंबरच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये सतिश सालियान यांचं नाव कुठेही घेतलेलं नाही, असा दावा आदित्य ठाकरेंकडून करण्यात आला आहे. पोस्टमधील कोणतंही विशिष्ट वाक्य सतीश सालियान यांच्याकडे निर्देश करत नसल्याचंही त्यांनी आपल्या उत्तरात नमूद केलं आहे.

बदनामीचा कोणताही हेतू नाही

सतिश सालियान यांच्याविरोधात बदनामीचा कोणताही हेतू नसल्याचंही यावेळी आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी स्पष्ट केले आहे. संबंधित प्रकरणात करण्यात आलेल्या आरोपांवर अधिकृत तपास होण्याची गरज आहे. या प्रकरणाची निष्पक्षपातीपणे चौकशी व्हावी अशी मागणी देखील यावेळी आदित्य ठाकरे यांनी केली आहे. 26 पानांच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी सतिश सालियान यांच्या नोटिशीला उत्तर दिलं आहे. सतिश सालियान यांचे सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT