Mumbai News : दिशा सालियन मृत्यू प्रकरणी हायकोर्टाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल झाला आहे. अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय घडामोडीना वेग आला आहे. त्यातच आता दिशा सालियनचे वडिल सतीश सालियन यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विरोधात 500 कोटींचा अब्रु नुकसानीचा दावा केला आहे. त्यांनी या प्रकरणाची नोटीस घेऊन मातोश्रीवर गेले होते. त्यामुळे शनिवारी मातोश्रीच्या परिसरात शिवसैनिक सुद्धा जमले होते. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. यावेळी आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी नोटीस स्वीकारल्यानंतर आमदार वरुण सरदेसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणात कसलाच पुरावा नाही, केवळ प्रसिद्धीसाठी मीडियासमोर बडबड करत असल्याची टीका त्यांनी केली आहे.
दोन दिवसापूर्वी या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच शनिवारी सतीश सालियन आणि त्यांचे वकिल नोटीस घेऊन मातोश्रीवर गेले होते. त्यावेळी मातोश्रीबाहेर मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांची गर्दी जमली होती. त्याचवेळी आदित्य ठाकरे यांच्या वकिलांकडे 500 कोटींचा अब्रु नुकसानीचा दावा करणारी नोटीस देण्यात आली. त्यानंतर माध्यमाशी बोलताना आदित्य ठाकरेंचे भाऊ आमदार वरुण सरदेसाई म्हणाले, “गेल्या पाच-सहा वर्षात एकदा नाही अनेकदा मिडियात सांगितलय की, आदित्य ठाकरे हे ना सुशांत सिंहला ओळखत होते, ना दिशा सालियानला ओळखत होते. अनेकदा वारंवार हे सांगितलय. मात्र त्यानंतरही नाहक आरोप केले जात आहेत.”
'गेल्या पाच-सहा वर्षांपासून वारंवार असेच प्रकार केले जात आहेत. या आधी सुशांतसिंह राजपूतच्या बाबतीत करण्यात आले. त्याची सीबीआय चौकशी झाली. त्याचा क्लोजर रिपोर्ट सादर झाला. कोणी-कोणी आरोप केले, मीडियावाले, भाजपवाले होते. यात आरोपाचा एकही पुरावा कोणी देऊ शकला नाही. केवळ प्रसिद्धीसाठी मीडियासमोर बडबड करायची. पुरावे कसलेच नाहीत, अशी टीका वरुण सरदेसाई यांनी केली.
दिशा सालियन मृत्यू प्रकरण 2020 चं होते. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडी सरकार होतं. तेव्हा ADR सादर केला. चौकशी झाली. त्यानंतर 2022 साली सरकार बदलले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाले. 2022 साली परत एकदा या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना झाली. 2023 पासून आतापर्यंत 2026 पर्यंत परत एकदा याच प्रकरणाची एसआयटी तपासणी केली. त्या एसआयटीने ज्या-ज्या लोकांनी आरोप केले, त्या सर्वांना बोलावले.
तुमच्याकडे जे पुरावे आहेत ते द्या असे सांगितलं. मग, 14 जून 2026 रोजी याच SIT ने या प्रकरणात कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले. त्या प्रतिज्ञापत्रात म्हटलय की, पहिल्या सरकारने जी तपासणी केली ती योग्य होती. त्यात एकही तफावत नव्हती,' असे वरुण सरदेसाई म्हणाले. त्यानंतर सतीश सालियन म्हणतायत, आमचे स्टेटमेंट घेतले नाही असे ते म्हणतायत. पण त्यांचं स्टेटमेंट अनेकदा रेकॉर्ड करण्यात आले आहे. त्यासाठी वरुण सरदेसाई यांनी आधीच्या प्रतिज्ञापत्राचा दाखला दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.