BJP VS Congress Sarkarnama
महाराष्ट्र

BJP Politics : काँग्रेसला धक्का! कल्याणमधील माजी आमदारांमुळे पक्ष संपला, भाजपमध्ये प्रवेश करताच पदाधिकाऱ्यांचा आक्रोश

BJP Vs Congress : काँग्रेसला सध्या धक्क्यांवर धक्के बसत असून अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. तर काही प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.

शर्मिला वाळुंज

Summary :

  1. डोंबिवलीतील काँग्रेसचे माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करताच काँग्रेसला मोठा धक्का बसला.

  2. काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून वरिष्ठांवर कल्याणमधील माजी आमदारामुळे पक्ष संकटात टाकल्याचा आरोप केला.

  3. या प्रवेशामुळे भाजपचा गोट डोंबिवली-कल्याणमध्ये मजबूत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Mumbai News : काँग्रेसच्या डोंबिवलीमधील माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्ष प्रवेशानंतर काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे. कल्याणमधील माजी आमदारांनी काँग्रेसची परिस्थिती गंभीर करून ठेवली आहे असा थेट आरोप त्यांनी पक्षातील वरिष्ठांवर केला आहे.

भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत डोंबिवली काँग्रेसमधील माजी नगरसेवकांनी गुरुवारी (ता.21) भाजप पक्षात प्रवेश केला. यामुळे काँग्रेसला डोंबिवलीमध्ये मोठे खिंडार पडले आहे. आगामी पालिका निवडणुका लक्षात घेता पक्ष फोडाफोडीचे राजकारण सुरु झाले आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटात पदाधिकारी पक्ष प्रवेश करत आहेत. कल्याण डोंबिवलीमध्ये काँग्रेसचे चार नगरसेवक असून त्यातील 3 डोंबिवलीमध्ये आहेत.

पदाधिकाऱ्यांच्या या पक्ष प्रवेशानंतर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संतोष केणे यांनी आपली नाराजी उघड केली आहे. विधान परिषदेचे माजी आमदार संजय दत्त यांच्यावर केणे यांनी गंभीर आरोप केले आहेत. कल्याण डोंबिवलीमधील काँग्रेसची परिस्थिती एका डायनोसोरने गंभीर करून ठेवली आहे. तो डायनोसोर दिल्लीत जाऊन बसला आहे. त्यांनी कधीही पक्ष संघटनेवर लक्ष दिलं नाही. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सदस्य होण्यासाठी लागणारे आठ प्रदेश प्रतिनिधी निवडीसाठी केवळ त्यांनी आतापर्यंत प्रयत्न केले आहेत. या व्यतिरिक्त पक्षासाठी त्यांनी काही केलेलं नाही.

तीन वेळा त्यांना विधानपरिषद दिली, तरी सुद्धा त्यांनी पक्ष संघटना बांधली नाही. कल्याणच्या पक्ष कार्यालयासाठी जो निधी दिला तो सुद्धा त्यांनीच खाऊन टाकला असा दावा देखील केणे यांनी केला आहे. यामुळे आता संतोष केणे पक्षावर नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे. नाराज केणे सुद्धा पक्ष सोडणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे येत्या पालिका निवडणुकीपूर्वी काँग्रेसला आणखी मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

FAQs :

प्र.१: डोंबिवली काँग्रेसचे माजी नगरसेवक कुठल्या पक्षात गेले?
उ: त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

प्र.२: काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया काय होती?
उ: त्यांनी वरिष्ठांवर आरोप करत नाराजी व्यक्त केली.

प्र.३: या प्रवेशाचा राजकीय परिणाम काय होईल?
उ: डोंबिवली-कल्याणमध्ये भाजप मजबूत होईल आणि काँग्रेस संकटात सापडेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT