महाराष्ट्र

भावना गवळींच्या अडचणीत वाढ; ईडीकडून समन्स जारी

सरकारनामा ब्युरो

मुंबई : यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळींच्या (Shiv Sena MP Bhavana Gawali) यांच्या कंपनीच्या संचालकाला काल अंमलबजावणी संचलनालयाने (Directorate of Enforcement) ने अटक केली. त्यानंतर अवघ्या चोवीस तासातच भावना गवळी यांनाही ईडीने समन्स (ED summons to Shiv Sena MP Bhavana Gawali) बजावले आहे. यात त्यांना येत्या 4 ऑक्टोबर रोजी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

काही दिवसांपुर्वी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केल्यानंतर ED ने गवळी यांच्याशी संबंधित 9 ठिकाणांवर छापेमारी केली. त्यानंतर काल पुन्हा शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या परभणीतील पाथरी येथील ठिकाणी असलेल्या मालमत्तांवर ED ने मोठी कारवाई करत त्यांचे सहकारी सईद खान (Saeed Khan) यांना अटक केली. सईद खान यांना महिला प्रतिष्ठान ट्रस्टचं कंपनीमध्ये रुपांतर केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. सईद खान हे संबंधित कंपनीचे संचालक आहेत. भावना गवळी यांच्या विविध ट्रस्ट आणि कंपन्यांचा कारभार पाहात होते. हरीश सारडा यांनी तक्रार केल्यानंतर ईडीने ही मोठी कारवाई केली.

दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील काही नेते आणि मंत्री ईडीच्या जाळ्यात अडकले आहेत. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपामुळे सध्या सत्ताधारी पक्षातील नेत्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सोमय्यांनी केलेल्या आरोपामुळे या नेत्यांची ईडीची चौकशी सुरु झाली आहे. सध्या शिवसेनेचे तीन मंत्री ईडीच्या (ED) रडारवर आहेत. यात खासदार भावना गवळी, परिवहन मंत्री अनिल परब आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे.

100 कोटी वसुलीप्रकरणात परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांची काल सात तास ईडीकडून चौकशी करण्यात आली, तर, सिटी को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांच्यावर भाजपने आरोप केले आहेत. तर आता भावना गवळी (Bhavana Gawali) यांना ईडीने समन्स पाठविले आहेत. त्यामुळे आता त्या ईडीसमोर हजर राहतात का, हे पाहण महत्त्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT