Shivsena MLA Balaji Kinikar And ED Sarkarnama
महाराष्ट्र

धक्कादायक; सेना आमदाराला ED शी सेटलमेंट करण्याची ऑफर

ED offer to settlement : भल्या भल्यांना घाम फोडणारी ED आता आरोपीच्या पिंजऱ्यात

सरकारनामा ब्युरो

ठाणे : नेहमी आपल्या नावानेच भल्या-भल्यांना घाम फोडणारी आणि भांबेरी उडवून देणारी ईडीच (ED) आता आरोपीच्या पिंजऱ्यात उभी राहिली आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथचे शिवसेनेचे (Shivsena) आमदार डॉ. बालाजी किणीकर (Dr. Balaji Kinikar) यांना 'ईडी'कडून समन्स (ED Notice) मिळाल्याची कॉपी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात २ फेब्रुवारी रोजी त्यांना हजर राहण्याबाबत सांगण्यात आले आहे. मात्र आता ही कॉपी नकली असून आपल्याला अद्याप अशी कोणतीही नोटीस मिळालेली नाही असे किणीकर यांनी स्पष्ट केले आहे.

इतकेच नाही तर यापुर्वीही काही दिवसांपुर्वी आमदार किणीकर (Dr. Balaji Kinikar) यांनी आपल्यासोबत खोडसाळपणा झाला असल्याचे सांगितले. 'सकाळ माध्यम समुहा'शी बोलताना ते म्हणाले, एक ते दिड महिन्यापूर्वी मला दिल्लीवरुन मिश्रा नावाच्या व्यक्तीचा फोन आला होता. यात ते म्हणाले होते, तुमच्याविरुद्ध ईडीमध्ये तक्रार आली असून आम्ही पुढील कारवाई करत आहोत. त्यानुसार तुम्हाला नोटीस देखील पाठवण्यात आलेली आहे. मात्र यावर किणीकर यांनी आपल्याला अशी कोणतीही नोटीस आलेली नसल्याचे स्पष्ट केले.

पण त्यावर समोरून किणीकर यांना इशारा वजा ऑफर देण्यात आली. जर पुढील कारवाई आणि बदनामी टाळायची असल्यास दिल्लीला येवून सेटलमेंट करु शकता, असे त्यांना सांगण्यात आले. (ED offer to settlement) मात्र ही नोटीस किंवा कथित सेटलमेंटची ऑफर आपण गांभीर्यांने घेतलेली नाही. पण हा खोडसाळपणा करणाऱ्यांचा तपास केला जात असल्याचे यावेळी किणीकर म्हणाले. तसेच या संदर्भात पक्षातील वरिष्ठांना माहिती दिल्याचे सुध्दा किणीकर यांनी स्पष्ट केले.

ED Notice to mla balaji kinikar
ED Notice to mla balaji kinikar

डॉ. बालाजी किणीकर ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ मतदारसंघातून शिवसेना पक्षातून सलग ३ वेळा निवडून आले आहेत. २००९ मध्ये पहिल्याच प्रयत्नात ते तब्बल २० हजारांच्या मताधिक्यांने आमदार झाले होते. तर २०१४ साली त्यांचा २ हजार मतांनी अगदी निसटता विजय झाला होता. मात्र २०१९ च्या निवडणूक त्यांनी दमदार कामगिरी करत तब्बल ३० हजारांच्या मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. काँग्रेस वगळता अन्य विरोधी उमेदवारांची डिपॉझिट देखील जप्त झाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT