ED Raids in ₹113 Crore Crypto Fraud Case Sarkarnama
महाराष्ट्र

ED Raids: 113 कोटींच्या क्रिप्टो फसवणुकीचा पर्दाफाश? मुंबई-ठाण्यात EDचे छापे; 1 कोटी रोकड जप्त

ED Raids in ₹113 Crore Crypto Fraud Case: लखानपाल याने स्वतःला केंद्रीय अर्थ मंत्रालयाचा अधिकारी असल्याचे भासवून गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला आणि त्यांना ‘मनी ट्रेड कॉइन’मध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.

सरकारनामा ब्यूरो
  1. ‘मनी ट्रेड कॉइन’मध्ये ₹113 कोटी 10 लाखांची फसवणूक; EDची मुंबई-ठाण्यात छापेमारी.

  2. छाप्यात सुमारे ₹1 कोटी रोकड, कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे जप्त.

  3. अमित लखानपालसह चौघांवर तपास; दुबई कनेक्शन आणि अँटिग्वा-बार्बुडा पासपोर्टचा खुलासा.

मुंबई : ‘मनी ट्रेड कॉइन’मध्ये मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून तब्बल ११३ कोटी १० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मुंबई आणि ठाण्यात विविध ठिकाणी छापेमारी केली. ठाणे पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने ही कारवाई केली आहे.

या छापेमारीदरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी सुमारे १ कोटी रुपयांची रोकड, महत्त्वाची कागदपत्रे तसेच डिजिटल उपकरणे जप्त केली आहेत. या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार आणि फसवणुकीच्या विविध पैलूंचा तपास ईडीकडून सुरू आहे.

या प्रकरणाच्या तपासात अमित लखानपालसह चौघांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. लखानपाल याने स्वतःला केंद्रीय अर्थ मंत्रालयाचा अधिकारी असल्याचे भासवून गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला आणि त्यांना ‘मनी ट्रेड कॉइन’मध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.

गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवून अनेकांकडून पैसे उकळण्यात आल्याचा आरोप आहे. मात्र, अपेक्षित परतावा न मिळाल्याने या व्यवहारामागील फसवणुकीचा प्रकार समोर आला.

तपासादरम्यान आरोपींकडे अँटिग्वा आणि बार्बुडा देशाचे पासपोर्ट आढळल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय अमित लखानपाल हा सध्या दुबईत राहत असल्याचे तपासातून समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, परदेशातील कनेक्शन आणि आरोपींच्या मालमत्तेबाबतही ईडीकडून तपास केला जात आहे.

ठाणे पोलिसांच्या मूळ गुन्ह्याशी संबंधित आर्थिक व्यवहारांची साखळी तपासताना ईडीने ही छापेमारी केली. जप्त करण्यात आलेल्या डिजिटल उपकरणांमधून आणि कागदपत्रांमधून आणखी माहिती मिळण्याची शक्यता आहे.

११३ कोटींच्या या कथित क्रिप्टो फसवणूकप्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, परदेशात पैशांचे व्यवहार झाले आहेत का आणि गुंतवणूकदारांकडून जमा झालेल्या रकमेचा नेमका वापर कुठे करण्यात आला, याचा तपास ईडीकडून सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT