Ncp Leader Eknath Khadse
Ncp Leader Eknath Khadse Sarkarnama
महाराष्ट्र

Eknath Khadse : मुख्यमंत्री पदाचा दावेदार होतो म्हणून भाजपमध्ये माझा छळ..

सरकारनामा ब्युरो

जळगांव : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री पदासाठी उत्तर महाराष्ट्राला कधी संधी मिळाली नाही, असे म्हणत खंत व्यक्त केली होती. त्यानंतर भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी देखील या संदर्भात विधान केले आहे. (Ncp) आपण मुख्यंमत्री पदाचे दावेदार आहोत हे समजताच आपला भाजपमध्ये छळ सुरू झाला, असा आरोप खडसे यांनी केला आहे. (Maharashtra)

पात्रता असूनही उत्तर महाराष्ट्राला अद्याप मुख्यमंत्रीदाची संधी मिळाली नसल्याची नाराजी देखील खडसे यांनी व्यक्त केली. आपल्या राजकीय जीवनातील सर्वाधिक काळ भाजपमध्ये काढल्यानंतर पक्षातील नेत्यांवर आरोप करत खडसेंनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. शरद पवार यांच्या नेतृत्वात खान्देशात राष्ट्रवादी काॅंग्रेस मजबूत करण्याचा निर्धार देखील खडसे यांनी पक्ष प्रवेशाच्या वेळी बोलून दाखवला होता.

नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदाच्या बाबतीत उत्तर महाराष्ट्रावर अन्याय झाला, त्या भागातील पात्र नेत्यांना देखील संधी मिळाली नाही, असे म्हणत खडसे यांच्या दुखऱ्या जखमेवर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला. अजित पवारांच्या या विधानाने खडसे यांच्या मनातील खदखद देखील बाहेर आली. प्रसार माध्यमांशी बोलतांना त्यांनी भाजपवर थेट आरोपच केला.

आपण मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहोत हे समजताच आपला छळ सुरू झाला. भूखंड प्रकरण, दाऊदच्या बायकोशी संबंध जोडणे असे प्रकार सुरू झाले. आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यामार्फत माझे फोन टॅपिंग देखील केले गेले. विधानसभा निवडणुकीत माझे तिकीट देखील कापण्यात आले.

६० वर्षात उत्तर महाराष्ट्राला मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली, पण हा अन्याय आणि या भागातील नेत्यांवर होणार अन्याय कधी न कधी भरून निघेल, अशी आशा देखील खडसे यांनी व्यक्त केली. फडणवीस दिल्लीला गेल्यानंतर भाजप आमदार गिरीश महाजन यांना मुख्यमंत्री पदाची जबाबदारी देखील असा उपरोधिक टोला देखील खडसे यांनी लावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT