Eknath Shinde News : 'इंडी’ आघाडीचे राजकारण हे फक्त ‘फेक नॅरेटिव्ह’वरच टिकू शकते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे! निवडणूक आयोगात अंतर्गत मतभेद असल्याच्या खोट्या व निराधार बातम्या पसरवून ‘इंडी’ आघाडीचे नेते उर बडवत आनंदोत्सव साजरा करत होते. परंतु तिन्ही निवडणूक आयुक्तांच्या ‘संयुक्त निवेदना’ने त्यांच्या या फुग्यातली हवा पूर्णपणे काढून टाकली आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
'याच खोट्या मुद्द्याचा आधार घेऊन विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि ‘इंडी’ आघाडीच्या नेत्यांनी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह
यांना बदनाम करण्याचा व त्यांच्यावर पातळी सोडून टीका करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. अशा पद्धतीने बदनामीचे राजकारण करणाऱ्या राहुल गांधी व ‘इंडी’ नेत्यांनी देशाच्या जनतेकडे त्वरित माफी मागितली पाहिजे.', अशी मागणी त्यांनी केली.
'संवैधानिक संस्थांना सतत बदनाम करणे, लोकशाही प्रक्रियांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे आणि जनतेत संभ्रम पसरवणे हाच या ‘इंडी’ आघाडीचा मूळ स्वभाव आहे. देशाची जागरूक जनता हा घृणास्पद खेळ चांगल्या प्रकारे ओळखून आहे आणि योग्य वेळी यांना त्यांची जागा नक्कीच दाखवेल.', असा इशारा देखील त्यांनी दिला.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले की, देशाची १४० कोटी जनता मोदीजी आणि अमित भाईंच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. त्यामुळे विरोधी पक्षांच्या खोट्या आरोपांमुळे तसूभरही फरक पडत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.