Eknath Shinde News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या आठ खासदारांसोबत बैठक घेतल्याचे वृत्त समोर आले होते. शिंदेंकडून ऑपरेशन टायगर अॅक्टिव्ह करत ठाकरेंना धक्का देण्याची तयारी करण्यात आल्याचे या वृत्तात म्हटले होते. शिंदेंसोबत बैठक करण्याऱ्या खासदारांच्या नावाची यादी देखील समोर आली होती. अखेर एकनाथ शिंदेंनी मौन सोडत खरे काय ते सांगून टाकले आहे.
शिंदे म्हणाले की, 'उबाठाच्या खासदारांसोबत झालेल्या कथित बैठकीचे वृत्त पूर्णपणे निराधार, खोडसाळ आणि गैरसमज निर्माण करणारे आहे. अशी कोणतीही बैठक झालेली नाही.'
'उबाठाचे खासदार फुटून शिवसेनेत येणार असल्याच्या बातम्या गेल्या एक-दीड वर्षांपासून पसरवल्या जात आहेत. परंतु, त्यात कोणतेही तथ्य नाही. ती केवळ अफवा आहे. त्यामुळे सनसनाटी निर्माण करण्यासाठी अशा पद्धतीच्या बातम्या देणे माध्यमांनी टाळले पाहिजे.', असे देखील त्यांनी सांगितले आहे.
शिंदेंच्या शिवसेनेते खासदार नरेश म्हस्के यांनी याबाबत पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, ऑपरेशन टायगरच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही. आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यामध्ये कोल्डवाॅर सुरू आहे. त्याचा परिणाम म्हणजे नेते संपर्कात आहे, अशा अफवा पसरवणाऱ्या बातम्या पेरल्या जात आहेत.
विरोधी पक्षातील नेत्यांना केक भरवायला वेळ आहे. मात्र, आपल्या पक्षातील नेत्यांसाठी सभा घेण्यासाठी त्यांना वेळ नाही, असा टोला देखील म्हस्केंनी आदित्य ठाकरेंना लगावला.
उद्धव ठाकरेंच्या खासदारांनी बैठकीबाबतचे वृ्त्त फेटाळले आहे. खासदार अरविंद सावंत म्हणाले, मी 'मातोश्री'शी कधीच प्रतारना करणार नाही. मला उभा चिरला तरी मी ठाकरेंसोबतच राहणार.
खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले, चुकीच्या बातमीवर स्पष्टीकरण देणार नाही. अशी कुठली बैठक झाल्याची मला माहिती नाही. बैठक झाली असेल तर त्याचे फोटो द्या. खासदार संजय देशमुख आणि खासदार राजाभाऊ वाजे यांनी देखील बैठकीचे वृत्त निराधार असून असल्या कुठल्याही बैठकीचे निमंत्रण आम्हाला नव्हते तसेच आम्ही अशा कुठल्या बैठकीला गेलो नाही, असे सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.